शारीरिक संबंधांवेळी शिक्षिकेची गळा दाबून हत्या, मृतदेह विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी फरार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

एका शिक्षिकेची तिच्याच पतीने गळा दाबून हत्या केली आहे. शारीरिक संबंधादरम्यान झालेल्या वादातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

शारीरिक संबंधांवेळी शिक्षिकेची गळा दाबून हत्या

point

मृतदेह विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी फरार

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : उत्तर प्रदेशातील रामपूरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेची तिच्याच पतीने गळा दाबून हत्या केली आहे. शारीरिक संबंधादरम्यान झालेल्या वादातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पत्नीचा मृतदेह अंथरुणावर विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला होता. बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर आणि माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मृत शिक्षिकेच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप

याप्रकरणी मृत शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर काही काळापासूनच त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही अनेकदा वादाच्या तक्रारी समोर आल्या होत्या, मात्र सामाजिक दबावापोटी प्रकरण मिटवले जात होते. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्ट मार्टमसाठी पाठवला आणि पतीसह दिराविरुद्ध हुंडाबळी व हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

हे ही वाचा : 'मला त्याचं हृदय बाहेर काढायचं होतं..' लहानपणी आई-वडिलांना मारहाण होताना पाहिलं, 20 वर्षांनी उगवला भयानक सूड

रागाच्या भरात दाबला पत्नीचा गळा

रामपूरचे अपर पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने सांगितले की, घटनेच्या वेळी उभयतांमध्ये शारीरिक संबंधांदरम्यान काही कारणावरून तीव्र वाद झाला. रागाच्या भरात त्याने पत्नीचा गळा दाबला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या पतीने कोणालाही काहीही न सांगता तिथून पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला.

हे ही वाचा : पाऊस पडतोय म्हणून थांबली अन् घडलं भयानक, मजुरांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

आरोपीला न्यायालयीन कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंचा आणि आरोपांचा अधिक तपास करत आहेत.
 

हे वाचलं का?