धक्कादायक... डोसा खाल्ला अन् दोन छोट्या मुलींचा गेला जीव, आई-वडिलांची प्रकृती अत्यंत नाजूक

मुंबई तक

Gujrat News : आंबवलेल्या पीठाचा डोसा खाल्ल्याने कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना 1 एप्रिल 2026 रोजी घडली असून संबंधित घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

ADVERTISEMENT

gujrat news
gujrat news
google news

बातम्या हायलाइट

point

डोसा खाल्ल्याने चिमुकलींचा दुर्दैवी अंत

point

डोशाचे पीठ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले

Gujrat News : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंबवलेल्या पीठाचा डोसा खाल्ल्याने कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही घटना 1 एप्रिल 2026 रोजी घडली असून संबंधित घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : साखरपुड्याआधी तरुणी बॉयफ्रेंडसोबत झाली फिजिकल, प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेलं...

नेमकं काय घडलं?

मृत मुलांचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांच्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा हा विमलने डोसा बनवण्यासाठी जवळच्या घनश्याम डेअरी नावाच्या दुकानातून आंबवलेले पीठ आणले. दुसऱ्या दिवशी सकाळी, विमल, पत्नी भावना आणि त्याच्या दोन मुलींना उलट्या होऊ लागल्या आणि प्रकृती खालवली. परिस्थिती बघता त्यांना रुग्णालयात दाखल केले. 

दोन्ही चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू

3 एप्रिल रोजी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. 5 एप्रिल रोजी त्यांच्या चार वर्षांच्या मुलीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. विमल आणि भावना यांच्यावर सध्या गंभीर अवस्थेत उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली. घटनेनं प्रशासनाने तातडीने कारवाई केली. कुटुंबियांकडून स्थानिक पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. 

डोशाचे पीठ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले

एक तपासाचा भाग म्हणून अहमदाबाद महापालिकेनं डेअरीतून त्याच डोशाचे पीठ आणले होते. नंतर ते पीठ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने मृत्यूचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी इंडिया टुडे या वृत्त माध्यमाला दिली. 

हे वाचलं का?