5 वर्षांच्या चिमुरड्यावर शाळेत सामूहिक बलात्कार अन् हत्या, शाळेच्या संचालकावर कुटुंबियांचा खळबळजनक आरोप

मुंबई तक

एका खाजगी शाळेत युकेजीत शिकणाऱ्या एका 5 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी कुटुंबाने शाळेचे संचालक आणि शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

5 वर्षांच्या चिमुरड्यावर शाळेत सामूहिक बलात्कार अन् हत्या

point

शाळेच्या संचालकावर कुटुंबियांचा खळबळजनक आरोप

Crime News : एका पाच वर्षीय चिमुरड्याच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. एका खासगी निवासी शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे संचालक तरुण कुमार यांच्या विरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना मंगळवारी (7 एप्रिल) अटक केली आहे. बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे. 

'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

घटनेच्या दिवशी हा चिमुरडा हॉस्टेलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारासाठी पाटणा येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेचे संचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी मुलावर अत्याचार करून धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या केली. पीडित मुलाच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलच्या रात्री मुख्याध्यापक त्याच्या लहान भावाला स्वतःसोबत झोपण्यासाठी घेऊन गेले होते, त्यानंतर ही भयंकर घटना घडली.

हे ही वाचा : तरुण महिलांची वाळवत टाकलेली अंतर्वस्त्रे चोरायचा, तेच वस्त्र परिधान करून कॅमेऱ्यासमोर अश्लील...

शाळा आणि हॉस्टेल सील

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शाळा आणि हॉस्टेल सील केले आहे. या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून शाळेच्या एका सुरक्षारक्षकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे, तर इतर दोन महिला कर्मचारी आणि एका शिक्षकाला चौकशीनंतर हमीवर सोडण्यात आले आहे. एसपी अपराजित लोहान यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत.

हे ही वाचा : बीड : पोलीस दलात सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यानं मध्यरात्री संपवलं जीवन, घटनेनं परिसर हादरला

चिमुरड्याच्या शरीराचे पोस्ट मार्टम

मंगळवारी सकाळी पाटणा येथील पीएमसीएच (PMCH) मध्ये वैद्यकीय मंडळाने मुलाच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका शिक्षण संस्थेत घडलेल्या या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलीस आता पोस्ट मार्टम अहवालाची प्रतीक्षा करत असून त्याद्वारे अत्याचाराच्या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळू शकेल.
 

हे वाचलं का?