बॉयफ्रेंडने फोन करून खोलीत बोलवलं! काही वेळानंतर तीन मित्रसुद्धा आले अन् घडलं असं काही की...

मुंबई तक

एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित शिक्षिकेने गुरुवारी महिला पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल होती.

ADVERTISEMENT

तीन मित्रसुद्धा आले अन् घडलं असं काही की...
तीन मित्रसुद्धा आले अन् घडलं असं काही की...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडने फोन करून खोलीत बोलवलं!

point

त्यानंतर, तीन मित्रांनी मिळून पीडितेसोबत केलं निर्दयी कृत्य

Rape Case: हरियाणाच्या गुरुग्राममधील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित शिक्षिकेने गुरुवारी महिला पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल होती. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, शुक्रवारी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणातील आरोपी जीम ट्रेनर असून ते झुंबा डान्सचं देखील ट्रेनिंग देत असल्याची माहिती पीडित महिलेनं दिली. 

फोन करून घरी बोलवलं 

पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यातच पीडित शिक्षिकेची गौरव नावाच्या तरुणासोबत एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर, 1 ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा आरोपीने पीडितेला फोन करून तिला आपल्या मित्राच्या घरी बोलवलं. त्या खोलीत आधी कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र, काही वेळानंतर आरोपीने आपल्या इतर मित्रांना सुद्धा तिथे बोलवलं. 

हे ही वाचा: 'माझी पत्नी स्टोव्हवर स्वयंपाक करत होती...', अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; डोळ्यात अश्रू

नंतर मित्राने सुद्धा केला बलात्कार 

पीडितेने तक्रार करताना सांगितलं की गौरव महिलेला त्याच्या मित्राच्या खोलीत घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर, आरोपीने त्याच्या नीरज नावाच्या मित्राला सुद्धा फोन करून बोलवून घेतलं आणि नीरजने सुद्धा पीडित महिलेसोबत घृणास्पद कृत्य केलं. इतकेच नव्हे तर, गौरव आणि नीरजने त्यांच्या अभिषेक आणि योगेश नावाच्या मित्रांना सुद्धा खोलीत बोलवलं आणि त्या दोघांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला. 

पीडितेला घटनास्थळीच सोडून फरार 

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्यानंतर सर्व आरोपी पीडितेला घटनास्थळीच सोडून फरार झाले. दुसऱ्या दिवशी, 2 ऑक्टोबरला पीडिता तिच्या घरी पोहोचली आणि तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर, पीडित महिलेने 2 ऑक्टोबर रोजी महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रकरणातील आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp