कपलचा ‘तो’ फोटो ठरला शेवटचा, 650 फुट खोल दरीत कोसळून बॉयफ्रेंडचा मृत्यू
Boyfriend dies after falling into 650 feet deep gorge : एक कपल डोंगरावर सेल्फी घेत असताना पाय घसरून बॉयफ्रेंडचा (Boyfriend) 650 खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गर्लफ्रेंड सुदैवाने बचावली आहे.
ADVERTISEMENT
Boyfriend dies after falling into 650 feet deep gorge : सेल्फी अभावी अपघात झाल्याच्या अथवा मृत्यू ओढवल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. याबाबत तरूणांमध्ये अनेकदा जनजागृती करून सुद्धा या घटनांना आळा बसत नाही आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एक कपल डोंगरावर सेल्फी घेत असताना पाय घसरून बॉयफ्रेंडचा (Boyfriend) 650 खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत गर्लफ्रेंड सुदैवाने बचावली आहे. बॉयफ्रेंडचा अशा धक्कादायक मृत्यूनंतर गर्लफ्रेंडने (Girlfriend) सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर केली होती. (boyfriend died after falling into 650ft ditch in front of girlfriend shocking story)
घटनाक्रम काय?
या घटनेत 30 वर्षाचा एंड्रिया मेजेटो आणि गर्लफ्रेंड (Girlfriend) सारा ब्रेगंटे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एका प्रसिद्ध हिल स्टेशनवर फिरण्याचा प्लान केला होता. त्यानुसार ते रोट्झो येथील डोंगराळ भागात फिरायला गेले होते. या ठिकाणी कलपने खुप मजा मस्ती केली. खुप सारे फोटो काढले,संपुर्ण परीसराचा मनसोक्त आनंद घेतला. मात्र उंचावरचा एक फोटो काढताना मोठा घात झाला आणि बॉयफेंडचा जीव गेला.
हे ही वाचा : वासनांध बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य.. नेमकं घडलं तरी काय?
650 फुट दरीत कोसळला…
खरं तर या घटनेत कपलने एक फोटो खुपच उंचावरून घेतला होता.या फोटोनंतर एँड्रियाचा (Boyfriend) फोन खाली पडला.हा फोन उचलालयला गेलेल्या एंड्रियाचा पाय घरसला आणि थेट जाऊन तो 650 फुट खोल दरीत कोसळला. या घटनेनंतर गर्लफ्रेंड साराला मोठा धक्का बसला होता.ही धक्कादायक घटना घडताच तिने लगेचच स्थानिकांना या घटनेची माहिती दिली होती. स्थानिकांनी रेस्क्यु टीमला (Rescue team) या घटनेची माहिती देताच, ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते. रेस्क्यु टीमने तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे खोल दरीत एंड्रियाचा शोध सुरु केला होता.मात्र तिथपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
एंड्रियाचा फोन खाली पडला होता.हा फोन उचलायचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल जाऊन 650 फुट खोल दरीत कोसळला होता. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोशल मीडियावर अखेरची पोस्ट
दरम्यान या घटनेने साराला मोठा धक्का बसला आहे. साराने एँड्रीया सोबतचा शेवटचा पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे. ‘आमचा शेवटचा एकत्र फोटो’, ‘तु’ सदैव माझ्यासोबत असशील’ अशी कॅप्शन साराने लिहत घटनेपुर्वीचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर तिचे मित्र तिचे सात्वन करत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अकोला हादरला! चौथीतील 4 विद्यार्थिनींवर शिक्षकच दररोज करायचे लैंगिक अत्याचार
दरम्यान या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. इटलीमध्ये ही घटना घडलीय.या घटनेने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT