प्रेम, अपहरण आणि गँगरेप… गर्लफ्रेंडच्या अब्रूचे मित्रांसोबत महिनाभर तोडले लचके
13 वर्षीय तरुणीचे अपहरण करून प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी तब्बल महिनाभर तिच्या लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

Gangrape case : फेसबुकवर ओळख झाली. संवाद वाढला आणि नंतर दोघे प्रेमात पडले. त्यानंतर तरुणाने गर्लफ्रेंडसोबत जे केले त्याने पूर्ण जिल्हाच हादरून गेलाय. भेटायला बोलावून तरुणाने मित्रांसह गर्लफ्रेंडवर सामूहिक बलात्कार केला. (A case of gang rape of a minor girl has come to light in Muzaffarpur, Bihar.)
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने फेसबुकवर अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर दोघे जवळ येत गेले. तरुणाने भेटण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडला बोलावून घेतले आणि नंतर ओलीस ठेवले.
वाचा >> Mumbai : डब्यात घुसला, जबरदस्ती अन् धावत्या ट्रेनमधून महिलेला दिलं ढकलून
त्यानंतर जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार होतं. आरोपी प्रियकराने त्याच्या मित्रांसह अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. तसेच कलम 164 अन्वये पीडितेचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे.
प्रियकरानेच आयुष्य केले उद्ध्वस्त
पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, माझी मुलगी एक महिन्यापासून बेपत्ता होती. पोलीस आणि आम्ही खूप शोध घेत होतो, पण तिचा कुठेही ठिकाणा सापडत नव्हता. सत्यानंदने तिचे अपहरण केले होते. अपहरणानंतर त्याने तिला जंगलात डांबून ठेवले. जंगलातच त्याने मित्रांसोबत अनेकवेळा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.