Crime: सीतापूरमध्ये सैराट… नराधम काकाने पुतणीला अंगण्यातच विळ्याने चिरलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

broke into the house and killed niece heinous act of the uncle in sitapur uttar pradesh
broke into the house and killed niece heinous act of the uncle in sitapur uttar pradesh
social share
google news

सीतापूर (उत्तर प्रदेश): ‘सैराट’सारख्या (Sairat) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे. घरातून पळून जाऊन प्रियकराशी (Boy Friend) लग्न करणाऱ्या तरुणीची तिच्या काकांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या हत्येचा आरोप तिच्या काकांवर आहे. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पणही केलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (broke into the house and killed niece heinous act of the uncle in uttar pradesh)

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

ही घटना सीतापूर जिल्ह्यातील बजनगर गावातील आहे. या घटनेची माहिती देताना सीतापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) एनपी सिंह यांनी सांगितलं की, बाजनगर गावातील एका 20 वर्षीय तरुणीचे त्याच गावात राहणाऱ्या रूप चंद्र मौर्य याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ज्याबाबत तिच्या घरच्यांनाही या नात्याची कुणकुण लागली होती.

हे ही वाचा >> शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

एएसपीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मुलीचे काका श्यामू सिंह यांना या संबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मुलीला गाझियाबादला पाठवून दिलं होतं. मुलीचे वडील पुतन सिंग तोमर हे गाझियाबाद येथे राहतात आणि नोकरी करतात. असे म्हटले जाते की, काही महिन्यांनंतर रूपचंद्र मौर्य देखील गाझियाबादला पोहोचला आणि मुलगी त्याच्यासोबत घरातून पळून गेली.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पळून गेल्यानंतर तरुणीने तिच्या प्रियकरासोबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. काही दिवसांपूर्वीच ती रूप चंद्रसोबत गावी परतली होती. ही बाब मुलीचे काका श्यामू सिंह यांना कळताच त्याचा संयम सुटला. शनिवारी तो रूपचंद्र याच्या घरी पोहोचला आणि आपल्या पुतणीला त्यांनी घरातून खेचून बाहेर काढलं आणि अंगण्यातच तिच्यावर विळ्याने वार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

हे ही वाचा >> पुणे हादरलं! लंडनमध्ये नोकरीला जाण्याआधीच वहिनीचा खून, पळून जाणारा दीरही ठार

पुतणीची अत्यंत थंड डोक्याने हत्या केल्यानंतर श्यामू सिंगने पिसावन पोलीस ठाणे गाठले आणि हत्येत वापरलेल्या विळ्यासह त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्णण केलं. एएसपीने सांगितले की, श्यामूने कबूल केलं आहे की, त्यानेच आपल्या भाचीची हत्या केली कारण ती रुप चंद्रसोबत पळून गेली होती. रुप चंद्र हा आधीच विवाहित होता आणि तसंच तो दुसर्‍या जातीती देखील होता.

ADVERTISEMENT

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मारेकरी श्यामू सिंग याला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT