मोठा भावाने छोट्या भावाच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला! मोबाईलमुळं घडलं भयंकर; पत्नी अन्...
Shocking Crime Viral News : मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भावा-भावात कोणत्या कारणामुळे वाद झाला?

महिलेनं सांगितलं धक्कादायक घटनेमागंच कारण

त्या शहरात नेमकं घडलं तरी काय?
Shocking Crime Viral News : मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. कमर्जी पोलीस ठाणे हद्दीतील चिलरी गावात मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावाचा प्रायव्हेट पार्टला चावा घेतला. ही धक्कादायक घटना पीडित व्यक्तीची पत्नी आणि मुलाच्या समोर झाली. जखमी झालेल्या श्यामसुंदर साहूचा मुलगा मोबाईल पाहत होता, याच गोष्टीमुळं मोठा भाऊ नाराज झाला. त्याने मुलाला समजावलं, पण नंतर राग्याच्या भरात श्यामसुंदरने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
नेमकं घडलं तरी काय?
जखमी व्यक्तीची पत्नी नीता साहूने म्हटलं की, मी स्वत: पाहिलं, माझ्या दीराने माझ्या पतीवर हल्ला केला. त्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मी जर थांबवलं नसतं तर माझा पती आणि मुलगा दोघांचाही मृत्यू झाला असता. आम्ही तिघांनी दीराला रोखलं. नाहीतर धक्कादायक घटना घडली असती. जखमी श्यामसुंदर साहूने म्हटलं की, माझा मुलगा मोबाईल पाहत होता.
हे ही वाचा >> "तुझा संतोष देशमुख करू" म्हणत तरूणावर कोयत्यानं हल्ला; 10 वार केले, बेशुद्धावस्थेत सोडून पळाले...
माझ्या मोठ्या भावाला वाईट वाटलं. आधी माझ्या मुलावर हल्ला केला, नंतर माझ्यावर हल्ला केला. माझ्या पत्नीने माझा जीव वाचवला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेवेळी श्यामसुंदरची पत्नी आणि मुलगा उपस्थित होता. महिलाने जेव्हा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने धारदार शस्त्र शोधलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
पत्नीने पतीचा जीव वाचवला, पण तोपर्यंत श्यामसुंदर रक्तबंबाळ झाला होता. जखमी झालेल्या श्यामसुंदरला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची पत्नी नीता साहूने म्हटलं की, हा हल्ला पूर्णपणे नियोजित होता आणि क्रूरपणे करण्यात आला. घटनेनंतर गावात खळबळ उडाली.
हे ही वाचा >> "तुझा संतोष देशमुख करू" म्हणत तरूणावर कोयत्यानं हल्ला; 10 वार केले, बेशुद्धावस्थेत सोडून पळाले...
पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण..
कमर्जी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, मेडिकल रिपोर्ट येईपर्यंत ठोस कारवाई शक्य नाही. याच कारणामुळे आरोपी फरार आहे. ज्यामुळे पीडित कुटुंबीय आणि गावातील लोक घाबरले आहेत.