अश्लील फोटो काढून बहिणीला ब्लॅकमेल केलं..नराधम भावाने केलं सर्वात घाणेरडं कृत्य! लाजिरवाण्या घटनेमुळं सर्वांनाच बसला हादरा
Today Shocking News Viral : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शामिल संजना भारती हत्या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी मुख्य आरोपी रुपेश कुमारला अटक केली आहे.

बातम्या हायलाइट

तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं आणि...

तिन्ही आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि गळा दाबून..

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
Today Shocking News Viral : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शामिल संजना भारती हत्या प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी मुख्य आरोपी रुपेश कुमारला अटक केली आहे. पोलिसांनी रुपेशला अटक करण्यासाठी एसआयटी गठित केली होती. या टीमने रुपेशचं बँक खातं ट्रेस करून त्याला अटक केली. दरम्यान, रुपेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पंजाब ते लखनऊपर्यंत छापेमारी केली होती. कारण कुर्की जप्तीच्या नंतरही तो पोलिसांच्या हातात सापडत नव्हता.
तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं आणि...
आरोपी रुपेशने या हत्याप्रकरणाबाबत पोलिसांना सांगितलं की, मृत महिला त्याची चुलत बहीण होती. तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केलं होतं. त्यानंतर तिच्यासोबत संबंध केले होते. याचदरम्यान, संजना गर्भवती झाली. त्यानंतर त्याने त्याचा मित्र अमन आणि त्याच्या एका सहकाराच्या मदतीनं संजनाच्या हत्येचा कट रचला.
हे ही वाचा >> सरकारचं लक्ष आहे का? चिमुकले 4-4 तास अडकले बसमध्ये, ट्रॅफिकमुळे 'हे' अवघं शहर गुदमरलं!
याचदरम्यान संजना जेव्हा 27 मे रोजी भगवानपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तिच्या कॉलेजमध्ये पोहोचली. तेव्हा तिन्ही आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह आरोपी अमनच्या शेतात पुरला. त्यानंतर 13 दिवसांनी संजनाचा मृतदेह शोधण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमनला आधीच अटक केली होती.
तर एका अन्य आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे. याप्रकरण कर्तव्यात कसूर केल्याने पोलीस अधिकारी गौरौल यांना निलंबीत करण्यात आलं होतं. पोलीस अधिक्षकांनी म्हटलं की, गौरोल यांनी आरोपींसोबत मिलिभगत केल्याचं पुरावे समोर आले आहेत. याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा >> पतीने बोगस ID बनवून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, पत्नीची सटकली अन् थेट कोर्टात गेली..नंतर घडलं भयंकर!
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
बिहारच्या जहानाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. येथील एका महिलेनं तिच्या पतीवर मानसिक, शारीरिक आणि व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीचा त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी महिलेनं सायबर क्राईम ब्रँचमध्ये तक्रार दाखल केली. ही धक्कादायक घटना नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुतबनचक परिसरात घडली.