पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये केमिकल टाकलं अन् घडलं..पतीला पहिल्या पत्नीसह केली अटक, धक्कादायक कारण आलं समोर!

Shocking Crime News Today :  दंतवेडा येथील किरंदूलमध्ये जमिनीच्या वादविवादामुळे सर्वात भयंकर घटना घडली. पतीने त्याच्या पत्नीसोबत सर्वात घाणेरडं कृत्य केलं. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Today Shocking Crime News
Today Shocking Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जमिनीच्या वादामुळे पत्नीला मारण्याचा प्रयत्न

point

पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक

point

त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना!

Shocking Crime News Today :  दंतवेडा येथील किरंदूलमध्ये जमिनीच्या वादविवादामुळे सर्वात भयंकर घटना घडली. पतीने त्याच्या पत्नीसोबत सर्वात घाणेरडं कृत्य केलं. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आरोपी पती लखमा कुंजामने त्याची पहिली पत्नी कुमे कुंजामसोबत मिळून दुसऱ्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या गुप्तांगात केमिकल टाकलं आणि कपड्याने तिचा गळा दाबला आणि नंतर धारदार शस्त्राने वार केले. मृत समजून दोन्ही आरोपी महिलेला सोडून पळाले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी महिलेनं तक्रार दाखल केली होती. जेव्हा ती 9 ऑगस्टच्या रात्री घरात एकटी झोपली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत हे घाणेरडं कृत्य केलं. आरोपीने स्वत:ला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. 

जमिनीच्या वादामुळे पत्नीला मारण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपींनी अनेकदा जबाब बदलला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असता, आरोपींनी गुन्हा कबूल केला. महिला तिची जमीन अन्य व्यक्तीला शेती करण्यासाठी देत होती आणि आरोपीला तिच्याजवळ येऊ देत नव्हती. याच कारणामुळे त्याने पत्नीवर हल्ला केला.

हे ही वाचा >> मुंबईत हळहळ! भूतबाधा झाल्याचं सांगत भोंदू बाबानं पीडितेला उपचारासाठी बोलावलं, नंतर महिलेवर करत राहिला बलात्कार अन्...

पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक

पोलिसांनी दोन्ही आरोपींना 19 ऑगस्टला अटक केली आणि त्यांना कोर्टात हजर केलं. त्यानंतर आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं. तसच फरार असलेला आरोपी जितेंद्र कुमारला तामिळनाडूत अटक केली. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. 

त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना!

मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं होतं. इंजीनिअर पतीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली होती. आरोपी पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला आणि संतापलेल्या पतीने किचनच्या स्लॅबवर पत्नीचं डोकं आपटलं. त्यानंतर पीडित महिलेचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि आरोपी फरार होऊन प्रयागराजला गेले. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पती आणि त्याच्या आईला अटक केली. 

हे ही वाचा >> मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात

हे वाचलं का?

    follow whatsapp