महिलेने अल्पवयीन मुलावर हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार, 'असं' अडकवलं जाळ्यात
एका महिलेने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रलोभन दाखवून आरोपी महिलेने पीडित मुलाला हॉटेलमध्ये नेले आणि त्याचावर अत्याचार केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेने अल्पवयीन मुलावर हॉटेलमध्ये नेत केला बलात्कार
'असं' अडकवलं जाळ्यात
Crime News : एका महिलेने अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तिला रिमांडसाठी पाठवण्यात आले आहे. छत्तीसगडमधील कबीरधाम परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रलोभन दाखवून अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलाची आणि आरोपी महिलेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. 1 मार्च 2026 रोजी या महिलेने मुलाला एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तिथे त्याने मुलावर भावनिक दबाव टाकला आणि विविध प्रलोभने देऊन त्याच्यावर अत्याचार केला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा : रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी CDR ची कॉपी काढली; सनसनाटी आरोप
बाहेर वाच्यता न करण्याची धमकी
या घटनेनंतर आरोपी महिलेने मुलाला कोणालाही काही न सांगण्यासाठी धमकावले होते. यामुळे मुलगा प्रचंड मानसिक दडपणाखाली आला होता आणि सुरुवातीला त्याने तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही. मात्र, कालांतराने त्याने धीर एकवटून पोलिसात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कबीरधाम पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : बलात्कार, गुप्तांगात बाटली आणि दगडाने ठेचलेला चेहरा..मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सापडला महिलेचा मृतदेह; नेमकं काय घडलं?
पॉक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद
याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कबीरधाम पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात राहताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद किंवा गुन्हेगारी कृती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.









