Crime : पत्नी, ‘तो’ आणि डायरी; कॉन्स्टेबल शोभाला पतीनेच घातल्या गोळ्या, Inside Story
Shobha Kumari murder : पाटणामध्ये शोभा कुमारी या महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी तिच्या पतीलाच अटक केली. त्याने हत्येच्या कारणाचा पोलीस चौकशीदरम्यान खुलासा केला.
ADVERTISEMENT
Constable Shobha Murder : काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी पाटणात एका महिला कॉन्स्टेबलची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला. या खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला. पोलिसांनी हत्या प्रकरणात ज्याला अटक केलीये, तो महिलेचा पतीच निघाला आहे. (Patna Constable Shobha Murder Case Husband Gajendra Surrenders In Jehanabad)
ADVERTISEMENT
तारीख 20 ऑक्टोबर, ठिकाण पाटणा स्टेशनजवळील एक हॉटेल. हॉटेलच्या खोलीत एका महिलेची हत्या करण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण, यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सापडलेला मृतदेह महिला कॉन्स्टेबलचा होता. तिचं नाव होतं शोभा कुमारी. तिच्या हत्येची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरली.
कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये शोकात बुडालेले असताना पोलीस विभागातील सर्वांनाच या घटनेचा धक्का बसला. शोभा यांच्यासोबत काम करणारे लोकांना हे कसं काय झालं हाच प्रश्न पडला. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे शोभाची हत्या कुणी केली? तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले, सीसीटीव्ही फुटेज खंगाळले.
हे वाचलं का?
पतीनेच केली शोभाची हत्या
पाटणा मध्ये विभागाचे एसपी वैभव शर्मा यांनी सांगितले की, तपास सुरू असताना शोभाचा पती गजेंद्र यानेच हा गुन्हा केल्याचे उघड झाले. खून करून तो फरार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. घरावर जप्तीची नोटीस लावण्यात आली. त्यानंतर गजेंद्रने रविवारी जेहानाबाद येथील पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
हे ही वाचा >> फ्लॅट बघायला गेली अन् झाला गँगरेप, प्रॉपर्टी एजंटनेच केला घात, काय घडलं?
‘पत्नीचे होते प्रेमसंबंध, दररोज…’
पोलिसांनी त्याला पाटण्यात आणले. येथे चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, ‘पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. या मुद्द्यावरून दोघांमध्ये दररोज भांडणे होत होती. तिच्या हत्येच्या दिवशी पाटण्यातील एका हॉटेलमध्ये त्यांच्यामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर त्याने पत्नीवर दोन वेळा गोळ्या झाडल्या.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Manoj Jarange : प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंचं घेतलं नाव; जरांगे पाटील काय बोलले?
१६ ऑक्टोबरला शोभा यांची ड्युटी होती पाटण्यात
आरोपीने सांगितले की, शोभा गेल्या चार वर्षांपासून वेगळी राहत होती. शोभा 2021 मध्ये बिहार पोलिसात दलात भरती झाली होती आणि ती भागलपूरमध्ये ड्युटीवर होती. ती रोहतास येथील बिहार विशेष सशस्त्र पोलीस-2 मध्ये प्रशिक्षण घेत होती. शोभा 16 ऑक्टोबर रोजी दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी पाटणा शहरात ड्युटीवर आली होती.
ADVERTISEMENT
‘डायरीमधून मिळाली अफेअरची माहिती’
आरोपीने पोलिसांना सांगितले की, तिच्याकडे एक डायरी सापडली. त्यातूनच तिच्या अफेअरची माहिती मिळाली, असं आरोपी म्हणाला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याबाबत त्याने जेहानाबाद येथूनच खरेदी केल्याचे सांगितले. याचीही चौकशी करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT