Crime News: लग्नासाठी उतावळ्या मुलाने आईचाच चिरला गळा अन् पाय, कारण जाणून पोलिसही हादरले
सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम गावात घडली जिथे महिला आपल्या मुलासह राहत होती. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य एका नातेवाईकाला अटक करण्यात आल्याचे मिळालेल्या माहितीतून समजते.
ADVERTISEMENT
Telangana Murder Case : तेलंगणातील (Telangana) सिद्धीपेट जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 45 वर्षीय महिलेची तिच्याच मुलाने हत्या केली. या हत्येमागचं कारण जाणून पोलिसही (Telangana Police) हादरले आहेत. याबाबत पोलिसांनी गुरुवारी (24 ऑगस्ट) ही माहिती दिली. (Crime News 21 yrs Old Boy Killed his Mother in Telangana)
ADVERTISEMENT
ही घटना बुधवार आणि गुरुवारी (23-24 ऑगस्ट) मध्यरात्री सिद्धीपेट जिल्ह्यातील बांदा मेलाराम गावात घडली जिथे महिला आपल्या मुलासह राहत होती. या हत्येप्रकरणी महिलेचा मुलगा आणि अन्य एका नातेवाईकाला अटक करण्यात आल्याचे मिळालेल्या माहितीतून समजते. माहितीनुसार, महिलेच्या मुलीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासादरम्यान पीडित मृत महिलेचा मुलगा आणि अन्य एका नातेवाईकाने गुन्ह्याची कबुली दिली.
MNS Jagar Padyatra: अमित ठाकरे म्हणाले पुढच्या वर्षी राज ठाकरेंची सत्ता येईल, तेव्हा…
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपीने त्याच्या आईची विटांनी मारहाण करून हत्या केली आणि नंतर तिचा गळा आणि पाय चिरले. हा सर्व प्रकार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न आरोपी मुलाने केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 21 वर्षीय ईश्वर असं आरोपीचं नाव असून त्याने 45 वर्षीय आई व्यंकटम्मा यांची निर्घृण हत्या केली.
हे वाचलं का?
Crime: लव्ह्, सेक्स आणि धर्मांतर! अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
हत्येचं कारण जाणूर पोलिसही हादरले!
माहितीनुसार, दिव्यांग ईश्वर त्याच्या आईवर लग्नासाठी मुलगी शोधण्याचा दबाव आणत होता. अपंग आणि बेरोजगार असल्याने त्याला मुलगी मिळत नव्हती, त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली. या गोष्टीचाच राग त्याचा आईवर होता. असं असल्याने त्याने साथीदारासह आईची हत्या केली. आरोपीने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT