लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण, 23 वर्षीय शिक्षिकेनं संपवलं जीवन

Crime News : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप शाळेच्या संचालकावर करणाऱ्या 23 वर्षीय शिक्षिकेने सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शाळा संचालकाला रविवारी अटक करून सोमवारी न्यायालयीन कोठडीत पाठवले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप

point

23 वर्षीय शिक्षिकेनं राहत्या घरात संपवलं जीवन

Crime News : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप शाळेच्या संचालकावर करण्यात आला. यानंतर 23 वर्षीय शिक्षिकेने सोमवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शाळा संचालकाला रविवारी अटक करून सोमवारी न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पाटणा जिल्ह्यातील बिहटा परिसरातील खळबळजनक आणि दुःखद ही घटना आहे.

हे ही वाचा : नागपूर: 19 वर्षीय BDS विद्यार्थ्यावर रॅगिंग, अश्लील कृत्य केल्याचा आरोप

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिका बिहटा परिसरातील एका गावतील रहिवासी असून एका स्थानिक खाजगी शाळेत शिकवत होती. आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरा विवाह करून बिहार सोडल्यापासून ती आपल्या लहान भावासोबत राहत होती आणि शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती.

तिने बिहटा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेचे संचालक देव कुमार मेहता (45) यांनी मंदिरात तिच्यासोबत विवाह केला होता. मात्र, हे नाते त्यांनी कधीही समाजासमोर आणले नाही. न्यायालयात जाऊन अधिकृत लग्न करण्याचे आश्वासन देत सुमारे तीन वर्षे तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला होता.

सत्य समोर आल्यानंतर उचलले पाऊल

आरोपी देव कुमार मेहता हे आधीच विवाहित असल्याचे पीडितेला समजल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. यानंतर तिने शनिवारी बिहटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात तिने अत्यंत हताश होऊन म्हटले होते की, आरोपीने तिला अंधारात ठेवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, या बदनामीनंतर तिच्याशी कोणीही लग्न करण्यास तयार होणार नाही.

पोलिसांची कारवाई आणि तपास

दानापूर-2 चे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) अमरेंद्र कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रविवारी देव कुमार मेहता यांना अटक केली. सुट्टीचा दिवस असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) पाठवण्यात आले. याच दरम्यान शिक्षिकेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित केले असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.