आई अन् मुलाने मिळून पोटच्या मुलीला विकले, नंतर तिचे जबरदस्ती लग्न लावले... नात्याला काळिमा फासणारी घटना

मुंबई तक

Crime news : काही रुपयांसाठी आईने आपल्या मातृत्वाशी गद्दारी केली आहे. तिने आपल्या मुलासोबत मिळून पोटच्या मुलीला हरियाणातील काही पुरुषांना विकले. पण, पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे पीडित तरुणी वाचली, ज्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना तुरुंगात टाकले. 

ADVERTISEMENT

Crime news
Crime news
google news

बातम्या हायलाइट

point

आईने आपल्या मातृत्वाशी गद्दारी केली

point

पोटच्या लेकीला पुरुषाला विकले

Crime news : उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही रुपयांसाठी आईने आपल्या मातृत्वाशी गद्दारी केली आहे. तिने आपल्या मुलासोबत मिळून पोटच्या मुलीला हरियाणातील काही पुरुषांना विकले. पण, पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे पीडित तरुणी वाचली, ज्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना तुरुंगात टाकले. 

हे ही वाचा : पुण्यातील फुरसुंगीत तरुण सराफ व्यवसायिकाने प्रेमसंबंधातून उचललं टोकाचे पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय?

तिच्या इच्छेविरुद्ध ज्ञात पुरुषाशी लग्न लावले

पीडितेच्या म्हणण्यांनुसार, तिला एका क्षुल्लक कारणाचे निमित्त सांगून चित्रकूटहून बांदा येथे बोलावले. तिचे स्वत:चे घर तिच्यासाठी मोठी समस्या निर्माण होईल, याची तिला कधीच कल्पना नव्हती. बांदा येथे पोहोचल्यावर तिच्या आई आणि भावाने मिळून तिला हरियाणातील एका अज्ञात व्यक्तींना 1 लाख 38 हजार रुपयांना विकण्याचा कट रचला. तिच्या इच्छेविरुद्ध एका अज्ञात पुरुषाशी तिचे लग्न लावून दिले. 

सर्व प्रकारचा छळ आणि निर्बंध असून, पीडितेनं हार न मानता, ती आरोपींच्या तावडीतून सुटका यश मिळवले आणि बांदाचे पोलीस अधीक्षक पलाश बन्सल यांच्याकडे धाव घेतली. पोलिसांनी प्रकरण समजून घेतलं आणि पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून घेतला. पोलिसांनी प्रकरणाचा तातडीने कारवाई करत भावाला अटक केली. 

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री शिंदे आणि अशोक खरातचे 17 वेळा फोनवर संभाषण, 'पण नेमके 'हे' CDR कोणी केले लीक?'

या प्रकरणात हरयाणातील दोघांना याआधीच अटक केली. संबंधित प्रकरण मानवी तस्करी नेटवर्कचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या टोळीच्या मुलाचा शोध घेत सामील असलेल्या इतर व्यक्तींना पकडण्याचे काम करत आहेत. पोलिसांच्या कारवाईने मोठा गुन्हा समोर आला आहे. 
 

हे वाचलं का?