"मला माझी,नणंद माझा नवरा अन् सासरे म्हणायचे तू..." पीडित पत्नीचा व्हिडिओ आला समोर
Crime News : प्रेम विवाह करुन तरुणीला पतीने छळले. तू एकदाची मरुन जा असे म्हणत तिचा अनेकदा छळ केला. अंतिम क्षणी या सर्व जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्या प्रियकरासोबत केला विवाह त्याच्याच सासरच्यांनी आत्महत्या करण्यास केलं प्रवृत्त

पीडितेने आत्महत्येपूर्वी बोलून दाखवली मनातली सल
Crime News : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये अमरीन नावाच्या तरुणीने जुनैद नावाच्या एका तरुणासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. ती मोठ्या थाटामाटात आपल्या सासरी आली. तिच्या नवीन संसाराला सुरुवात झाली होती. मात्र, तिचं सासरी जाणं म्हणजे जणू काही मरणयातणेला दिलेलं आमंत्रणच. अमरीनने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता. अशावेळी तिने त्या व्हिडिओत जे काही सांगितलं आहे, ते ऐकूण तिच्या आई - वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.
हेही वाचा : पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपलं, प्रवाशांची उडाली दाणादाण, फोटो आले समोर
हे प्रकरण मुरादाबाद येथील भोजपूर ठाणे क्षेत्रातील सुंदरनगर पीपलसाना येथील आहे. अरमीन या तरुणीने वयाच्या 22 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. हे कृत्य करण्याआधी तिनं आपल्या वडिलांना फोन केला आणि ती भावूक झाली. आपली मुलगी का रडत आहे? असा सवाल तिच्या वडिलांना सतावत होता. त्यामुळे त्यांनी तरुणीचं सासर गाठलं. मात्र, घरी जाईपर्यंत तरुणीने आत्महत्या केली होती.
या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता, पोलिसांनी शव आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी एका रुग्णालयात पाठवला. अशावेळी पोलिसांनी तपास केला असता, तरुणीचा मोबाईल फोन सापडला. मोबाईल फोनच्या माध्यामातून या आत्महत्येचा शोध सुरु करण्यात आला. या तपासादरम्यान, आत्महत्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे.
नेमकं व्हिडिओत काय होतं?
व्हिडिओत अमरीन म्हणाली की, माझा पती मला सांभाळून घेत नाही. त्यांना प्रत्येक वेळी माझीच चूक दिसते. ते मला नेहमी म्हणतात की, तू मर. माझी नणंद आणि माझी सासू मला मर असं म्हणत मला छळते, असे त्या व्हिडिओमध्ये होते.
हेही वाचा : मुंबईसह उपनगरात पावसाचं थैमान; मध्य रेल्वेतील 'या' रेल्वेस्थानकात शिरलं पाणी, मुंबईकरांची दैना
दरम्यान, पोलिसांना अद्यापाही पॉस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. पोलिसांचे म्हणणं आहे की, जर काही पुरावे मिळाल्या, आरोपींवर कारवाई केली जाईल. मृत तरुणीची आई आपल्या लेकीच्या अन्यायाविरोधात न्यायाची मागणी करत आहे.