गळ्याभोवती तार गुंडाळून बलात्कार, सेक्युरिटी गार्डचं विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य
Crime News : आनंदनगर परिसरात PG मध्ये राहणाऱ्या इंटीरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप झाला आहे. पोलिसांनी 10 पथके तयार करून अवघ्या 8 तासांत आरोपी सुरक्षा रक्षक धर्म सिंह याला अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गळ्याभोवती तार गुंडाळून बलात्कार
सेक्युरिटी गार्डचं विद्यार्थीनीसोबत क्रूर कृत्य
Crime News : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आनंदनगर परिसरात पेइंग गेस्टमध्ये (PG) राहणाऱ्या इंटीरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर विद्यार्थिनी रात्री सुमारे 10 वाजता PGच्या छतावर गेली होती. त्यावेळी PGमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा धर्म सिंह आधीपासूनच छतावर उपस्थित होता. काही वेळाने विद्यार्थिनी छतावरून खाली जाण्यासाठी निघाली असता धर्म सिंहने तिचा मार्ग अडवल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : ठाकरे पुन्हा कोर्टात, सिब्बलांच्या नव्या युक्तिवादाने फुटीर खासदारांवर गंडांतर?
गळ्याभोवती तार गुंडाळली, अन् केला बलात्कार
विद्यार्थिनीला सुरक्षा रक्षकाचे इरादे योग्य नसल्याचे लक्षात आल्याने तिने तेथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी आरोपीने तिच्या गळ्याभोवती तार गुंडाळली. त्यामुळे ती स्वतःला सावरू शकली नाही आणि आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विद्यार्थिनीने आरोपीकडे सोडून देण्याची विनंती केली, मात्र त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. या घटनेमुळे विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : ती 20 मिनिटं... मोदी आणि पवारांच्या खासदार भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय?
