'प्रियकरासोबत लग्न करणार', पत्नी शेवटपर्यंत ठाम राहिली, शेवटी पतीचं भयंकर पाऊल

मुंबई तक

Crime News : झाशीमध्ये 45 वर्षीय जितेंद्र अहिरवार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर गंभीर आरोप करणारे दोन व्हिडीओ केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'प्रियकरासोबत लग्न करणार',

point

पत्नी शेवटपर्यंत ठाम राहिली, शेवटी पतीचं भयंकर पाऊल

Crime News : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये पत्नी आणि तिच्या कथित प्रेमसंबंधाच्या वादातून 45 वर्षीय जितेंद्र अहिरवार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी जितेंद्र यांनी दोन व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी आणि प्रदीप नावाच्या एका युवकावर गंभीर आरोप केले आहेत. पत्नीचे प्रदीपसोबत संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. पत्नी आपल्याला सोबत ठेवणार नसून प्रदीपसोबत विवाह करणार असल्याचं सांगत असल्याचंही जितेंद्र यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. उपचारादरम्यान जितेंद्र यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं.

जितेंद्र अहिरवार हे झाशीतील मोठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावई गावचे रहिवासी होते. ते सुमारे 45 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा कपिल बोलू शकत नाही. मुलगा आशीष आणि नीलम यांचं लग्न झालं होतं. सुमारे तीन वर्षांपूर्वी आशीषचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जितेंद्र पत्नी, मुलगा आणि सुनेसह झाशीतील पंचवटी कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होते. जितेंद्र खासगी काम करत होते. गावात त्यांची सुमारे अडीच एकर शेती असून ते अधूनमधून गावाकडे ये-जा करत होते.

एका युवकाचं त्यांच्या घरी येणं-जाणं वाढलं अन्.. 

जितेंद्र यांचा चुलत पुतण्या करण याने सांगितलं की, झाशीमध्ये राहत असताना एका युवकाचं त्यांच्या घरी येणं-जाणं होतं. त्यामुळे जितेंद्र यांच्या पत्नीची त्याच्याशी मैत्री झाली आणि नंतर ती प्रेमसंबंधात बदलल्याचा आरोप आहे. जितेंद्र यांना याची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. करणच्या म्हणण्यानुसार, वाद वाढल्यानंतर पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने जितेंद्र यांना खोलीत बंद करून मारहाण केली. या प्रकारामुळे ते मानसिकदृष्ट्या त्रस्त होते.

बुधवारी जितेंद्र पावई गावात आले आणि त्यांनी विष प्राशन केलं. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना झाशीच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या एका 20 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये जितेंद्र उलटी करताना दिसत असून, पत्नीचे प्रदीपसोबत संबंध असल्याचा आरोप करताना दिसतात. दुसऱ्या 1 मिनिट 27 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये त्यांनी पत्नी आणि प्रदीपने खोलीत बंद करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मोठ पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मेंद्र सिंह यांनी जितेंद्र यांचा पत्नीशी वाद झाला होता आणि त्यानंतर त्यांनी विष प्राशन केल्याचं सांगितलं. अद्याप कुटुंबीयांकडून तक्रार देण्यात आलेली नसून, तक्रार मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. प्रकरणाचा तपास सुरू आहे.