हत्याप्रकरणात 7 वर्ष शिक्षा भोगली, तुरुंगातून सुटून आला अन् दीड महिन्यात भयंकर घडलं!
सात वर्षांची शिक्षा भोगून दीड महिन्यापूर्वी तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीचा गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. कन्नौजमध्ये घडलेल्या या घटनेत खून की आत्महत्या? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हत्याप्रकरणात 7 वर्ष शिक्षा भोगली
तुरुंगातून सुटून आला अन् दीड महिन्यात भयंकर घडलं!
UP Crime News : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात तुरुंगातून सुटलेल्या एका व्यक्तीचा गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. राजकिशोर दुबे (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुमारे दीड महिन्यापूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. मात्र, सुटकेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच त्याचा मृतदेह आढळल्याने या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकिशोर दुबे याच्या डोक्याला गोळी लागलेली होती.
हेही वाचा : अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी
मध्यरात्रीच्या सुमारास राजकिशोर दुबे यांचा मृतदेह आढळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका झाडाखाली मध्यरात्रीच्या सुमारास राजकिशोर दुबे यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली होती. घटनास्थळावरून दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. पथकाने घटनास्थळावरून ठसे आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.
हेही वाचा : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!
