'तू माझी नाहीस तर कोणाचीच होणार नाहीस', भर मंडपात नवरीवर गोळ्या झाडल्या, सनकी प्रियकराचं मोठं कांड
Crime News : 8 वर्षीय आरती कुमारी हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. वऱ्हाडी मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होती, तर दुसरीकडे स्टेजवर धार्मिक विधी सुरू होता. नवरी आणि नवरदेव एकमेकांसमोर उभे होते, नातेवाईक फोटो काढण्यात मग्न होते. मात्र, याच गर्दीत मृत्यू दबा धरून बसला होता याची कुणालाच कल्पना नव्हती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'तू माझी नाहीस तर कोणाचीच होणार नाहीस'
भर मंडपात नवरीवर गोळ्या झाडल्या, सनकी प्रियकराचं मोठं कांड
Crime News : लग्नाचा उत्साह, सनई-चौघड्यांचे सूर आणि आनंदाचे वातावरण असलेल्या विवाह सोहळ्यात एका सनकी प्रियकराने रक्ताचा सडा पडलाय. "तू माझी नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही," या विकृत भावनेतून एका एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने थेट स्टेजवर चढून नवरीच्या गळ्यात माळ पडण्यापूर्वीच तिच्यावर गोळ्या झाडल्या. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा नगर पंचायत परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक वरात बक्सरमधील मल्लाह टोली येथे आली होती. 18 वर्षीय आरती कुमारी हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. वऱ्हाडी मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होती, तर दुसरीकडे स्टेजवर धार्मिक विधी सुरू होता. नवरी आणि नवरदेव एकमेकांसमोर उभे होते, नातेवाईक फोटो काढण्यात मग्न होते. मात्र, याच गर्दीत मृत्यू दबा धरून बसला होता याची कुणालाच कल्पना नव्हती.
स्टेजवर चढला आणि गोळी झाडली...
धार्मिक विधी सुरू असतानाच, आरोपी दीनबंधू मल्लाह याने तोंडाला रुमाल बांधून अचानक स्टेजवर प्रवेश केला. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने कमरेला लावलेली बंदुक काढली आणि थेट आरतीवर गोळी झाडली. गोळी लागताच आरती रक्ताच्या थारोळ्यात स्टेजवरच कोसळली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे लग्नमंडपात एकच पळापळ आणि किंकाळ्या सुरू झाल्या. गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत आरोपी दीनबंधू तिथून पसार झाला.
हेही वाचा : प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...










