प्रेयसीची मंगळसूत्राने गळा आवळून हत्या, लिव्ह इन पार्टनरने क्रूरपणे संपवलं, कानाखाली मारल्याने सुरु झालेला वाद
Crime News : छत्तीसगडमधील रायगढ जिल्ह्यात 4 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने गळा दाबून हत्या केली असून, हत्येसाठी तिने घातलेल्या मंगलसूत्राचाच वापर केल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीची मंगळसूत्राने गळा आवळून हत्या
लिव्ह इन पार्टनरने क्रूरपणे संपवलं
कानाखाली मारल्याने सुरु झालेला वाद
Crime News : छत्तीसगडमधील रायगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीपासून वेगळे होऊन गेल्या 4 वर्षांपासून एका तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा तिच्याच प्रियकराने निर्घृण खून केला.रायगढच्या कोत्रा रोड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे, कारण या हत्येसाठी प्रियकराने कोणत्याही बाहेरील शस्त्राचा वापर न करता, महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्राचाच वापर केला. धनेश्वरी विश्वकर्मा असे मृत महिलेचे नाव असून, 1 एप्रिल 2026 रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला तरी, शवविच्छेदन अहवालाने या प्रकरणाला वेगळे वळण दिले. अहवालात तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
लिव्ह-इन रिलेशनशिपचा रक्तरंजित अंत
धनेश्वरी विश्वकर्मा हिचा विवाह मनोज विश्वकर्मासोबत झाला होता आणि तिला 3 मुलेही आहेत. मात्र, कौटुंबिक वादामुळे ती आपल्या पतीला सोडून 4 वर्षांपूर्वी माहेरी राहू लागली होती. याच काळात तिची ओळख विकेश बरेठ याच्याशी झाली आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. ते गेल्या 4 वर्षांपासून किरोडीमलनगर परिसरात पती-पत्नीसारखे राहत होते, मात्र कायदेशीररीत्या धनेश्वरीचा तिच्या पतीशी अद्याप घटस्फोट झाला नव्हता. हीच बाब त्यांच्या नात्यात तणावाचे मुख्य कारण ठरली होती. विकेशला तिच्याशी कायदेशीर लग्न करायचे होते, परंतु घटस्फोटाशिवाय ते शक्य नसल्याने त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. धनेश्वरीची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती आणि विकेश तिची देखभाल करत होता, परंतु या सततच्या आजारपणामुळे आणि लग्नाच्या मुद्द्यावरून त्यांच्यातील मानसिक ताण अधिकच वाढला होता.
हेही वाचा : निष्पाप वाटणाऱ्या चेहऱ्याने दगा दिला, दरोड्याचा बनाव अन् थंड डोक्याने नवऱ्याची हत्या, प्रियंका खुनी का बनली?
शुल्लक वादाचे रूपांतर हत्येत
घटनेच्या दिवशी विकेशची आजी त्यांच्या घरी आली होती. प्रकृती ठीक नसल्यामुळे धनेश्वरी वेळेवर जेवण बनवू शकली नाही, ज्यावरून विकेशने तिला सर्वांसमोर रागावले. या शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. संतापलेल्या विकेशने प्रथम धनेश्वरीला कानाखाली मारली, ज्यामुळे दुखावलेली धनेश्वरी घर सोडून जाण्यासाठी निघाली. ती घराबाहेर पडत असतानाच विकेशने मागून तिचे मंगलसूत्र पकडून ते जोरात मागे खेचले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धनेश्वरीचा गळा आवळला गेला आणि ती जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाली. काही वेळातच तिचा श्वास थांबला आणि तिचा मृत्यू झाला. घाबरलेल्या विकेशने हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्याचा अयशस्वी बनाव रचला आणि तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.









