35 वर्षीय महिला सरकारी कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण, HIV पॉझिटीव्ह सांगूनही नराधम ऐकेना... पीडितेच्या गुप्तांगावर हल्ला
crime news : गुरुवारी एका 35 वर्षीय महिला सरकारी कर्मचाऱ्यावर तिच्याच घरात लैंगिक अत्याचार केल्याचं सांगण्यात येतंय. आरोपीने महिलेला स्कार्फने बांधलं आणि नंतर चाकूने धाक धाकवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेनं आपण एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आरोपीने लोखंडी सळईने पीडितेच्या गुप्तांगावर हल्ला केला
चाकू दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार
Crime News : आंध्र प्रदेशातील पालना़डू जिल्ह्यात एक खळबळ प्रकार उघडकीस आला. गुरुवारी एका 35 वर्षीय महिलेला सरकारी कर्मचाऱ्यावर तिच्याच घरात लैंगिक अत्याचार केल्याचं सांगण्यात येतंय. आरोपीने महिलेला स्कार्फने बांधलं आणि नंतर चाकूने धाक धाकवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेनं आपण एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे सांगितलं.
हे ही वाचा : Astrology : मेष राशीत सूर्य ग्रहाचा होणार प्रवेश, 'या' राशींचं काही खरं नाही...
आरोपीने लोखंडी सळईने पीडितेच्या गुप्तांगावर हल्ला केला
या प्रकरणातील संतप्त झालेल्या आरोपीने लोखंडी सळईने तिच्या गुप्तांगावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली, परंतु सध्या तिचा जीव धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येतंय. संबंधित प्रकरण गुरुवारी दुपारी ३:३० ते ४:०० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिला घरात एकटीच राहत होती.
चाकू दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार
आरोपी एक अज्ञात व्यक्ती, पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला. त्याने महिलेचा जबरदस्तीने स्कार्फने गळा आवळला, नंतर चाकू दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडितेच्या भाच्याने तिला वारंवार फोन करून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी याची माहिती दिली होती.
हे ही वाचा : महाराष्ट्र : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या प्रियकराचे कांड, 29 वर्षीय विवाहित प्रेयसीला संपवले
स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. संबंधित प्रकरणात घटनेनं परिसर हादरून गेला.









