कानाखाली मारल्याचा राग, पत्नीने पतीला डोक्यात दगड घालून संपवलं; रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिली
Crime News : एका किरकोळ घरगुती वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली असून, आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कानाखाली मारल्याचा राग
पत्नीने पतीला डोक्यात दगड घालून संपवलं
रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिली
Crime News : गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील तिलकवाडा परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर थेट थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडात झाले. मूळचे मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कोसारी गावचे असलेले हे जोडपे रोजगारासाठी गुजरातमध्ये आले होते. 24 वर्षीय अरविंद नायक आणि त्यांची 32 वर्षीय पत्नी रेखा नायक हे दोघेही तिलकवाडा तालुक्यातील तेडिया साहिबपुरा भागात घरांच्या छताच्या बांधकामाचे मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात एका साध्या वादातून इतके मोठे संकट ओढवेल आणि संसाराचा असा अंत होईल, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. मात्र, एका रात्री झालेल्या भीषण वादाने या कुटुंबाचा हसता-खेळता संसार कायमचा उद्ध्वस्त केला आहे.
कानाखाली मारल्याचा राग आणि टोकाचे पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 10 च्या सुमारास घडली जेव्हा अरविंद आणि रेखा हे दोघेही वोरा गावातून भाजीपाला खरेदी करून आपल्या घरी परतत होते. हनुमंतेश्वर मंदिराच्या मागे हेरण नदीच्या काठावर पोहोचल्यावर त्यांच्यात कोणत्यातरी विषयावरून बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा वाद अत्यंत सामान्य वाटत होता, परंतु हळूहळू दोघांचाही राग अनावर होत गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वादाच्या भरात पती अरविंद नायक याने पत्नी रेखाला जोरात कानखाली मारली. या अपमानाचा रेखाला इतका राग आला की तिने संतापाच्या भरात जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि काहीही विचार न करता पतीच्या डोक्यात जोराने घातला. हा वार इतका भीषण होता की अरविंद गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला.
हेही वाचा : पुणे : प्रियकारासाठी प्रेमात वेडी झालेली आई, पोटच्या मुलाला पाण्यात बुडवून अन् जमिनीवर आपटून मारलं
दगडाचा प्रहार वर्मी लागल्यामुळे अरविंद जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा तिथेच मृत्यू झाला. ही घटना अत्यंत निर्जनस्थळी घडल्यामुळे मदतीसाठी कोणीही धावून येऊ शकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, पतीच्या मृत्यूनंतरही आरोपी पत्नी तिथून पळून गेली नाही, तर ती संपूर्ण रात्र आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिली. एका बाजूला पतीचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला रात्रभर तिथेच सुन्न होऊन बसलेली पत्नी असे विदारक दृश्य सकाळी उघडकीस आले. सकाळच्या सुमारास जेव्हा स्थानिक नागरिक त्या परिसरातून जात होते, तेव्हा त्यांना हा गंभीर प्रकार लक्षात आला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.









