एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणानं 26 वर्षीय तरुणीचं घर जाळलं, पीडिता किंचाळू लागली..

मुंबई तक

Crime News : तरुणाने एकतर्फी प्रेम प्रकरणातून 26 वर्षीय तरुणीच्या घरात पेट्रोल टाकून तिचं घरच पेटवून दिलं. या हल्ल्यात तरुणी 40 टक्के भाजली असून गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

प्रजोजल नकारल्याने तरुणाने घर पेटवलं

point

खिडकीतून घरात पेट्रोल ओतलं, घराला भीषण आग

Crime News : ओडिशातील राउरकेला येथून डोकं सून्न करणारी घटना घडली आहे. तरुणाने एकतर्फी प्रेम प्रकरणातून 26 वर्षीय तरुणीच्या घरात पेट्रोल टाकून तिचं घरच पेटवून दिलं. या हल्ल्यात तरुणी 40 टक्के भाजली असून गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे प्रकरण ओडिशातील सुंदरगढं जिल्ह्यातील बिसरा ब्लॉकच्या जराटोल गावातील आहे. 

हे ही वाचा : सूर्याचा कर्क राशीत प्रवेश, 'या' राशींचं चमकेल भविष्य

प्रजोजल नकारल्याने तरुणाने घर पेटवलं

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीवर अधिक काळापासून तरुणीच्या मागे होता. सुरूवातीला प्रकरण समोर आले की, तरुणाचं म्हणणे असं होतं की, त्या तरुणीने तिच्यासोबत राहावं. मात्र तरुणाने केलेल्या प्रपोजलला तिने नकार दिला होता. अशातच आरोपी संतापला आणि त्याने रागाच्या भरात तिच्या घरावर पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं. 

खिडकीतून घरात पेट्रोल ओतलं, घराला भीषण आग

पोलिसांचं म्हणणे असे की, शुक्रवारी रात्री तरुणी घरात झोपलेली होती. त्याचवेळी आरोपी तरुण हा त्या तरुणीच्या घरी पोहोचला आणि खिडकीतून घरात पेट्रोल ओतलं, यानंतर घराला भीषण आग लागली. काहीच वेळेत आग वाढली, आगीत फसलेली मुलगी आरडाओरड करू लागली. 

तरुणी 40 टक्के भाजून निघाली

तरुणी किंचाळू लागल्याने परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी आगीवर नियंत्रण ठेवलं. आगीत होरपळून निघलेल्या तरुणीला घरातून बाहेर काढण्यात आलं. नंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, तरुणी 40 टक्के भाजून निघाली होती. 

हे वाचलं का?