Dawood भारतातून फरार झाला ‘त्या’ रात्रीची कहाणी, मंत्रालयात ‘त्या’ नेत्याला फोन अन्…

ADVERTISEMENT

dawood Ibrahim went dubai from mumbai how did he reach pakistan without passport
dawood Ibrahim went dubai from mumbai how did he reach pakistan without passport
social share
google news

भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन (Underworld don) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आता शेवटचा घटका मोजत आहे. त्याच्या त्या अवस्थेमुळेच त्याला आता कराचीतील रुग्णालयात दाखल केले आहे. दाऊदला विषबाधा झाल्याचे वृत्त त्याच्याच जवळच्या एका व्यक्तीने दिले आहे. मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर दाऊदने कुटुंबासह भारत सोडून आणि दुबईला (Dubai) पळून गेला. मुंबईत 1993 आणि 26/11 मध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्या दोन्ही घटनांमध्ये दाऊदचा हात असल्याचे उघड झाले होते. देशातंर्गत केलेल्या अनेक घटनांमुळे त्याने भारत सोडून अनेक ठिकाणी आसरा घेतला. त्याने दुबईनंतर पाकिस्तानात आणि कराची, इस्लामाबादसह 9 ठिकाणी त्याने आसरा घेतला होता.

दाऊदने पाकिस्तान गाठले

दाऊदचा कराचीमध्ये ज्या रस्त्यावर बंगला आहे तो रस्ता नो-ट्रेस्पेस झोन असल्याचे सांगण्यात येते. त्या रस्त्यावर पाकिस्तानी रेंजर्सचा कडेकोट बंदोबस्तही असतो. दाऊदला आयएसआयचे संरक्षण असून अमेरिकेने त्याला दहशतवादी म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. दाऊदला 5 भाऊ आणि बहिणीही आहेत. मुंबई बॉम्बस्फोटानंतर अनीस इब्राहिम आणि नूरा इब्राहिम हे दोन भाऊ दाऊदसोबत दुबईला पळून गेले होते. मात्र 2007 मध्ये कराचीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नूराचा मृत्यू झाला होता. दाऊदची पत्नी झुबिना जरीन उर्फ ​​मेहजबीन ही मुंबईची रहिवासी असली तरी ती दाऊदसोबतच राहते. दाऊदने पाकिस्तानात एका पठाण महिलेशी दुसरे लग्न केले असून त्यांना 4 मुलं असल्याचेही सांगण्यात येते आहे.

हे ही वाचा >> Dawood Ibrahim: दाऊदला खरंच विष दिलं होतं का, काय आहे सत्य?

मुसाफिरखान्यावर छापा

एस. हसन जैदी यांच्या ‘डोंगरी टू दुबई’ या पुस्तकात 1986 मधील एक घटना सांगितली आहे. त्यावेळी मुंबई पोलीस दाऊदचा शोध घेत होते. त्याचवेळी दाऊद आणि मेहजबीनचे लग्न झाले होते, आणि त्यांच्या लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या अनेक लोकांना ताब्यात घेण्यासाठी ती कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दाऊदला मुंबईत राहणे अवघड झाले होते. एक दिवस गुन्हे शाखेच्या पथकाने डी कंपनीच्या मुख्यालय असलेल्या मुसाफिरखानावर छापा टाकला. या दुमजली इमारतीतील त्यावेळची शांतता बघून पोलिसांनाही धक्का बसला होता. त्या इमारतीचे एक विशेष हे होते की, इमारतीच्या तळमजल्यावरील लोकं कधीच झोपत नव्हते असं सांगितले जायचे, आणि त्याच तळमजल्यावर दाऊदचे अलिशान कार्यालयही होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांना फ्री हँड

दाऊदला पकडण्यासाठी क्राईम ब्रँचने त्या इमारतीतील प्रत्येक खोलीचा कोपरान् कोपरा शोधून काढला होता. त्याच रात्री पोलिसांनी दाऊदचा चुलत भाऊ आणि त्याच्या साथीदारांसह सगळ्यांनाच अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त डी. एस. सोमण यांनी दाऊदला अटक करण्यासाठी त्यावेळी वॉरंटहा काढला होता. त्यावेळी जी कारवाई करण्यात येत होती, त्यावेळी ती कारवाई अगदी गुप्त ठेवली होती, मात्र आयुक्त सोमण त्यावेळी पोलिसांना फ्री हॅंड दिला होता.

राजकीय नेत्याकडून परवानगी

पोलिसांच्या कारवाई चालू असतानाच दाऊद पसार झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले, तेव्हा पोलिसांनाही त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले. कारण त्याचवेळी पोलिसांना समजले की, पोलिसांमध्येही दाऊदचे एक पक्के नेटवर्क आहे. पोलीस अधिकाऱ्यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली तेव्हा, पोलिसांना हेही सांगण्यात आले की, पोलिसांच्या कारवाई आधी दहा मिनिटं त्याला सगळ्याच गोष्टी समजत होत्या. मात्र त्यानंतर ज्यावेळी त्याच्या मुसाफिरखान्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळी मात्र त्याला मोठा धक्का बसला होता. दाऊदवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मंत्रालयातील एका राजकीय नेत्याकडून परवानगही घेतली होती, त्यावेळी त्या नेत्याने पोलिसांना सांगितले होते की, दाऊदला जिवंत पकडायला हवे.

ADVERTISEMENT

पासपोर्टशिवाय दुबई गाठली

पोलिसांची कारवाई चालू असतानाच दाऊदने विमानतळ गाठले होते, आणि दुबईच्या दिशेने प्रवास चालू केला होता. नंतर दाऊदने आधी दिल्लीला जाणारे विमान पकडले त्यानंतर तेथून दुबईला कनेक्टिंग फ्लाइट घेतले असल्याचे नंतर पोलिसांना समजले. दाऊदने त्यावेळी विमानाने प्रवास केला असला तरी त्याने पासपोर्टशिवाय तो दुबईला पोहोचला होता. कारण त्याचा पासपोर्ट आधीच क्राईम ब्रँचने ताब्यात घेतला होता.

ADVERTISEMENT

बाबरीही तेव्हाच उद्ध्वस्त

दाऊदचे गुंड 31 डिसेंबरला डॉनच्या वाढदिवस साजरा करत होते, मात्र त्यावेळी दाऊदने कोणालाच किंमत दिली नव्हती. मात्र त्याचवेळी एक राजकीय घटना घडली होती आणि ती घटना होती, बाबरी मशिदीवरचा हल्ला. त्या घटनेने त्यावेळी वेगळे रूप धारण केले होते. 6 डिसेंबर 1992 रोजी एका हिंदू संघटनेच्या जमावाने अयोध्येतील बाबरी मशीदीवर हल्ला करून ती पाडली होती, आणि त्यावेळी देशात प्रचंड ताणतणाव निर्माण झाला होता. त्या घटनेनंतर देशभरात अनेक दंगलीही उसळल्या होत्या, आणि त्याचे काही पडसाद मुंबईतही उमटले होते.

हे ही वाचा >> Pat Cummins : आयपीएलने केले मालामाल! ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ठरला सर्वात महागडा खेळाडू

    follow whatsapp

    ADVERTISEMENT