बॉयफ्रेंडला घरी बोलावून सासू-सासऱ्यांची हत्या,पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

delhi gokulpuri case daughter in law arrested
delhi gokulpuri case daughter in law arrested
social share
google news

Gokulpuri case daughter in law Arrested : गोकुलपुरी परिसरात (Gokulpuri case) एका वृद्ध दाम्पत्याची निघृण हत्या करून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. राधे श्माम (72) आणि पत्नी वीणा (68) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव होते. या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. सुदैवाने या घटनेत मुलगा त्याची बायको आणि 6 वर्षाचा नातू यात बचावला होता. या हत्या प्रकरणाने शहर हादरलं होते. पोलिसांनी (Police) या प्रकरणात आता घरातल्याच एक व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना वाचून अनेकांना धक्का बसला आहे. (delhi gokulpuri case daughter in law arrested for killing mother in law and father in law)

ADVERTISEMENT

पोलिसांना (Police) सकाळी 7.20 च्या सुमारास घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठलं होते. या घटनेत घराच्या ग्राऊंड़ फ्लोर राहत असलेल्या वृ्द्ध दाम्पत्याचा मृतदेह सापडला होता. घरात चोरी करून आरोपींनी वृ्द्ध दाम्पत्याची (Old Couple) हत्या करत पळ काढला होता. राधे श्माम (72) आणि पत्नी वीणा (68) असे या मृत व्यक्तींची नावे होती. पोलिसांना सुरूवातील चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय होता. मात्र पुढे तपासात वेगळाच प्रकार समोर आला.

हे ही वाचा : आरोपीच्या घरी गेलेल्या पोलिसांसमोरच महिलांनी उतरवले कपडे

वृ्द्ध दाम्पत्याच्याच (Old Couple) वरच्या माळ्यावर मुलाचे कुटूंब राहत होते. 38 वर्षीय रवी रत्न, पत्नी मोनिका आणि 6 वर्षाचा मुलगा पहिल्या माळ्यावर राहत होते.या घटनेतून ते सुखरूप बचावले होते. त्यामुळे पोलिसांनी घरातीलच व्यक्तीवर संशय बळावला होता. पोलिसांनी कसून तपास केला असता या घटनेत प्रॉपर्टीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी मृत दाम्पत्याच्या मुलाची आणि सुनेची चौकशी केली होती. या चौकशीत पोलिसांचा सुनेवर संशय बळावला होता.

हे वाचलं का?

सुनेनेच रचला डाव

सुनेला पोलीसी खाक्या दाखवताच तिने संपुर्ण घटनेची माहिती दिली. सुनेने ही संपुर्ण हत्याकांड घडवून आणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सासऱ्यांची हत्या करण्यासाठी मोनिकाने दोन माणसांना बाहेरून बोलावले होते. यामधून एक मोनिकाचा बॉयफ्रेंड होता. ही दोनही माणसे घराच्या छतावरच रात्री येऊन लपली होती. त्यानंतर रात्री आरोपींनी सासू सासऱ्यांची हत्या केली. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. तसेच प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या वाटू नये यासाठी घरात चोरी करण्यात आली होती.

हे ही वाचा : नवी गर्लफ्रेंड सोबत असतानाच समोर आली जुनी प्रेयसी, मग काय..

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सुनेला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे. दिल्लीच्या गोकुलपुरी परीसरात ही घटना घडलीय. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहर हादरलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT