धाराशिव : प्रेमप्रकरणातून नात्याचा रक्तरंजित शेवट, पतीची निर्घृणपणे हत्या
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून पतीच्या हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. पत्तीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काय आहे नेमके प्रकरण?
बोलण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेऊन हत्या
Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून पतीच्या हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. पत्तीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या गोविंद शिवाजी कागडे (वय 27), पत्नी अंजली आणि तिचा प्रियकर सुभाष खोसे यांनी बोलण्याच्या बहाण्याने डोंगराळ ठिकाणी बोलावले होते. तिथेच गोविंदला चाकूने भोसकून दगडाने ठेचून ठार केले. ही दुर्दैवी घटना 19 नोव्हेंबर रोज दुपार 12.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांचे होणार कौतुक, 12 राशींचे जाणून घ्या भविष्य
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डोंगरावरील एका दरीत फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली आणि गोविंद यांचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. गोविंद हा अंजलीच्या मावशीचा मुलगा होता. मात्र, अंजलीचे तिच्या दुसऱ्या मावशीचा मुलगा शुभम खोसे याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि गोविंदसोबत झालेले लग्न तिच्या मनाविरुद्ध होते. विशेष म्हणजे, मयत गोविंद आणि आरोपी शुभम हे नात्याने चुलत भाऊ, तर अंजली ही त्यांच्या मामाची मुलगी आहे. आपल्या प्रेमसंबंधात पती गोविंद अडथळा ठरत असल्याने अंजली आणि शुभमने मिळून त्याला संपवण्याचा कट रचला.
बोलण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेऊन हत्या
ठरल्याप्रमाणे, गोविंदला बोलण्याच्या बहाण्याने रामकुंड परिसरातील कुंथळगिरी टेकडीवर बोलावण्यात आले. सरमकुंडी ते भूम रस्त्याजवळील डोंगरावर नेऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह डोंगरावरील एका दरीत फेकून दिला.
पोलिसांची तत्पर कारवाई; पळून जाणाऱ्या आरोपींना बेड्या
घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शिंदे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हत्येनंतर परिसरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अंजली आणि शुभम यांचा पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
हे ही वाचा : पार्सल पोहोचविण्याच्या घाईत भरधाव ट्रकने दिली धडक, डिलिव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू
या प्रकरणी मयत गोविंदचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर बाजीराव कागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) आणि 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले असून, वाशी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
