Govt Jobs : भारतीय रेल्वेत बंपर भरती! महिन्याला 40 हजारांहून अधिक पगार

भारतीय रेल्वेने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर आहे. या पदांसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Indian Railway Recruitment
Indian Railway Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

Indian Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती 2026 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 191 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चीफ लॉ असिस्टंट पदाच्या 17 जागा, पब्लिक प्रॉसिक्यूटरच्या 21, सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरच्या 8, ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी)च्या 79, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टरच्या 27, सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग)च्या 3 आणि लॅब असिस्टंट ग्रेड-3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) पदाच्या 36 जागांचा समावेश आहे. 

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. चीफ लॉ असिस्टंट पदासाठी कायद्याची पदवी आणि न्यायालयात वकील म्हणून तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. पब्लिक प्रॉसिक्यूटर पदासाठी कायद्याची पदवी आणि पाच वर्षांचा वकिलीचा अनुभव असणे गरजेचे आहे. सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीसह जनसंपर्क, जाहिरात, पत्रकारिता किंवा जनसंवाद विषयातील डिप्लोमा आवश्यक आहे. ज्युनियर ट्रान्सलेटर पदासाठी हिंदी किंवा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी आणि भाषांतराचा डिप्लोमा, प्रमाणपत्र किंवा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर पदासाठी पदवीसह कामगार कल्याण, कामगार कायदे, पर्सोनेल मॅनेजमेंट किंवा मानव संसाधन व्यवस्थापनाशी संबंधित पात्रता आवश्यक आहे. सायंटिफिक असिस्टंट पदासाठी मानसशास्त्र विषयात किमान 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, तर लॅब असिस्टंट पदासाठी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : सोन्याचा भाव थेट 6 हजारांनी कोसळला, चांदी तर फक्त... यालाच म्हणतात गोल्डन चान्स!

पगार किती मिळणार?

वयोमर्यादेचा विचार करता, 1 जानेवारी 2027 रोजी चीफ लॉ असिस्टंट पदासाठी 18 ते 40 वर्षे, पब्लिक प्रॉसिक्यूटरसाठी 18 ते 32 वर्षे, सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, ज्युनियर ट्रान्सलेटर आणि स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टरसाठी 18 ते 33 वर्षे, सायंटिफिक असिस्टंटसाठी 18 ते 35 वर्षे, तर लॅब असिस्टंटसाठी 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. यामध्ये एससी आणि एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षे, तर ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार सुरुवातीला 19,900 रुपयांपासून ते 44,900 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. चीफ लॉ असिस्टंट आणि पब्लिक प्रॉसिक्यूटर पदासाठी 44,900 रुपये, सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, ज्युनियर ट्रान्सलेटर, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टर आणि सायंटिफिक असिस्टंट पदासाठी 35,400 रुपये, तर लॅब असिस्टंट पदासाठी 19,900 रुपये प्रारंभिक वेतन निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी rrb.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.