‘पॉर्न पाहण्याची लागलेली सवय..’ अल्पवयीन मुलाला कसं संपवलं?, आरोपी बापानेच सांगितला घटनाक्रम!

ADVERTISEMENT

father poisoned his son and killed him in Solapur because he got into the habit of watching porn videos
father poisoned his son and killed him in Solapur because he got into the habit of watching porn videos
social share
google news

Solapur Murder : सोलापूरात स्वतःच्याच मुलाची विष देऊन हत्या करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांनी बापाला (Father) ताब्यात घेतल्यानंतर सांगितले की, हत्या करण्यामागचं त्यांनी नेमकं कारण सांगितले. मुलगा मोबाईलवर सतत पोर्न व्हिडीओ (Video) बघत होता, आणि शाळेतून त्याच्या तक्रारीही प्रचंड वाढल्या होत्या. त्याचबरोबर मुलगा मुलींनाही त्रास देत होता आणि त्याचे अभ्यासातही लक्ष नव्हते असंही पोलिसांनी सांगितले.(father poisoned his son and killed him in Solapur because he got into the habit of watching porn videos)

बेपत्ता असल्याचीही दिली तक्रार

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी विजयने 14 वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर त्याने ही गोष्ट त्याच्या पत्नीपासूनही लपवली होती. त्यानंतर 13 जानेवारी रोजी विजय आणि त्याची पत्नी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलिसात गेले. त्यानंतर बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास पोलिसांनीही सुरुवातही केली. तपास करत असतानाच त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्या घराजवळच्या नाल्यात सापडला.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ‘तुम्ही 400 पार कसे करता हेच बघतो…’, ठाकरेंनी मोदींना उघडउघड दिलं आव्हान!

आधी शेजाऱ्यांशी चौकशी

बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी हे स्पष्ट झाले की, विशालच्या शरीरात सोडियम नायट्रेटचे विष आढळून आले आहे. त्यानंतर तात्काळ या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विजयच्या कुटुंबीयांची आणि त्यांच्या शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्नीसमोर गुन्हा केला मान्य

पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, त्याचवेळी आरोपी विजयने पत्नीला आपण केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली. त्यावेळी त्याने पत्नीला सांगितले की, ‘विशालचे पोर्न व्हिडीओ बघण्याच्या सवयीमुळे त्रस्त झालो होता. त्या कारणामुळे त्याच्या शाळेतूनही त्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्या कारणामुळे मीही नाराज होतो असंही त्यानं स्पष्ट केलं’. विजय गुन्हा कबूल केल्यानंतर पत्नीने ही गोष्ट तिने पोलिसांना सांगितले व त्यानंतर विजयला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

मुलाला नाल्यात फेकलं

या प्रकरणातील आरोपीचं नाव विजय बट्टू असल्याचे पोलिसांनी सांगितले. विजय हा सोलापुरात टेलरिंगचं काम करून तो पत्नीसह दोन मुलांसह राहत होता. गुन्ह्याची कबुली देताना त्याने सांगितले की, 13 जानेवारीला सकाळी तो त्याच्या मुलाला त्याच्या दुचाकीवरून घेऊन गेला होता. त्यानंतर मुलाला सोडियम नायट्रेट कोल्ड्रिंक्समध्ये मिसळून त्याला दिले. त्यानंतर मुलगा बेशुद्ध होताच त्याचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> मॉडेल Poonam Pandey चे निधन; समोर आले मृत्यूचे कारण!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT