Bhimrao Dhonde : भाजपचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात? 1 कोटीची मागितली खंडणी; प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

former mla bhimrao dhonde threatened obscence video clip viral and demanded ransom of i crore
भीमराव धोंडेंनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
social share
google news

Bhimrao Dhonde News : बीड/आष्टी : आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एक कोटीची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दस्तुरखुद्द भीमराव धोंडेंनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून दोन महिलांसह एका व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (former mla bhimrao dhonde threatened obscence video clip viral and demanded ransom of i crore) 

ADVERTISEMENT

‘तुमचा अश्‍लिल व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो सोशल मिडियावर प्रसारीत करून तुमची बदनामी करू, त्याचबरोबर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत तुमची राजकीय कारकिर्द संपवून टाकू, हे होऊ द्यायचे नसेल तर एक कोटी रुपयाची व्यवस्था करा,’अशी धमकी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर धोंडेंनी पीए मार्फत 25 हजार रुपये दिल्याचेही स्पष्टपणे म्हटले आहे. 

हे ही वाचा : आनंदवनमधील मृत्यूचं गूढ उकललं, 25 वर्षीय तरूणीची आश्रमात कुणी केली हत्या?

गेल्या सहा महिन्यांपासून धोंडेंसोबत ही खंडणी आणि ब्लॅकमेलिंग होत होती. अहमदनगरच्या हॉटेल रॉयलमध्ये आणि आष्टी येथील धोंडेंच्या संपर्क कार्यालयात येऊन खंडणीखोर धोंडेंकडे सातत्याने अश्‍लिल क्लिप आपल्याकडे असल्याची धमकी देत होते. या प्रकरणानंतर भीमराव धोंडे यांनी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.  या तक्रारीनंतर पोलिसांनी अहमदनगर येथील कल्पना सुधीर गायकवाड, दुसरी बांगर नावाची महिला व इस्माईल दरियानी ऊर्फ भैय्या बॉक्सर यांनी संगनमत करून ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आणले आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान आता धोंडे यांच्या तक्रारीवरून कल्पना गायकवाड, बांगर (महिला) व इस्माईल दरियानी याच्या विरोधात गु.र.नं. 766/2024 भा.दं.वि. कलम 384, 385, 388, 34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बीडमध्ये खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! ठाकरे गटाच्या लोकसभा गटनेते पदी 'या' नेत्याची नियुक्ती

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT