Chandrapur Crime : आनंदवनमधील मृत्यूचं गूढ उकललं, 25 वर्षीय तरूणीची आश्रमात कुणी केली हत्या?

मुंबई तक

Chandrapur Crime News : आरतीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे हत्यार सापडले नव्हते. त्यामुळे आरोपीचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण तरीही ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्नोलॉजीच्या मदतीने पोलिसांनी आरोपी समाधान माळीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

आनंदवन आश्रमातील एका खोलीत 25 वर्षीय आरती चंद्रवंशी या तरूणीची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती.
chandrapur crime news 25 year old gird death mystry resolved boyfriend killed her anandvan shocking crime story
social share
google news

Chandrapur Crime News : विकास राजूरकर, चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात गुरूवारी 25 वर्षीय तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता. आरती चंद्रवंशी असं या मृत तरूणीचं नाव होते. या घटनेने आश्रमात एकच खळबळ माजली होती. आता या मृत्यूचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला देखील अटक देखील केली आहे. (chandrapur crime news 25 year old gird death mystry resolved boyfriend killed her anandvan shocking crime story)

प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमातील एका खोलीत 25 वर्षीय आरती चंद्रवंशी या तरूणीची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. आरतीचे आई-वडील घराबाहेर असताना आरोपीने संधी साधत तिची हत्या केली होती. या घटनेनंतर आई-वडील ज्यावेळेस घरी आले आणि त्यावेळेस बाथरूममध्ये मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. त्यानंतर मृत मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आता आरोपीला गजाआड करण्यात आले होते.

हे ही वाचा : Kundlik Khande : पोलिसांनी बेड्या ठोकताच शिंदेंची जिल्हाप्रमुखावर मोठी कारवाई

मृत तरूणीचे वडील दिगंबर चंद्रवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी व मुलीसह आनंदवनात राहत होते. बुधवारी दिगंबर आणि त्यांची पत्नी दोघेही पहाटे सेवाग्रामला निघाले, त्यामुळे मुलगी आरती घरी एकटीच होती. या दरम्यान दिगंबरने दुपारी आरतीला अनेकदा फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. त्यानंतर रात्री आठ वाजता दोघेही अपंग पती-पत्नी घरी आले असता बाथरूममध्ये आरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून त्यांना धक्काच बसला होता.

या घटनेनंतर मृत तरूणीच्या आई-वडिलांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता आरतीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे हत्यार सापडले नव्हते. त्यामुळे आरोपीचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पण तरीही ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्नोलॉजीच्या मदतीने पोलिसांनी आरोपी समाधान माळीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp