Kundlik Khande : पोलिसांनी बेड्या ठोकताच शिंदेंची जिल्हाप्रमुखावर मोठी कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुंडलिक खांडे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुंडलिक खांडे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी

point

एकनाथ शिंदे यांनी बीडच्या जिल्हाप्रमुखावर केली कारवाई

point

कुंडलिक खांडेंना बीड पोलिसांनी अटक केली

Kundlik Khande Latest News : शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर अखेर पक्षाने कारवाई केली. कुडंलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यातच दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका मारहाण प्रकरणात कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी खांडे यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी केली. (CM Eknath Shinde Expelled Beed District party chief Kundlik Khande from Shiv Sena)

ADVERTISEMENT

ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले बीडचे शिवसेनेचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर अटकेपाठोपाठ पक्षाने कारवाईचा बडगा उगारला. बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपण कशा प्रकारे मदत केली, याबद्दलचा संवाद असलेली कथित ऑडिओ क्लिप व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. 

कुंडलिक खांडेंना कोणत्या प्रकरणात झाली अटक?

शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असलेल्या कुंडलिक खांडे यांना बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. दोन महिन्यापूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण झाली होती. या प्रकरणात भादंवि 307 कलमान्वये कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा >> माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा? 

ऑडिओ क्लिप प्रकरणीही खांडेंविरुद्ध गुन्हे

कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांच्याविरोधात परळी आणि बीड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. पंकजा मुंडे यांना धोका देऊन बजरंग सोनवणे यांचे काम केल्याचे संभाषण या कथित क्लिपमध्ये आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडल्याचाही संवाद आहे.

हेही वाचा >> उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ 

दरम्यान, कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बीड-अहमदनगर मार्गावरील जामखेड येथे अटक केली. गुन्हे शाखेने खांडेंना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. 

ADVERTISEMENT

शिंदेंनी पक्षातून केली हकालपट्टी

खांडेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसेनेकडून एक प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी सांगितले की, शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT