लग्नासाठी माहेरी आलेल्या महिलेवर घरात घुसून बलात्कार, आरोपी निघाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

four children mother rape bye neighbor mujffarpur bihar crime story
four children mother rape bye neighbor mujffarpur bihar crime story
social share
google news

देशभरात बलात्काराच्या (Rape case) घटना वाढतच चालल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका चार मुलांच्या आईवर बलात्कार (Mother Rape) झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.आरोपीने घरात घूसुन महिलेचे हात-पाय बांधत तिच्या बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे महिलेवर बलात्कार करणारा आरोपी हा दुसरा तिसऱा कोणी नसून तिचा शेजारी होता. बलात्काराच्या आतापर्यंतच्या अनेक घटनांमध्ये आरोपी हा जवळचा नातेवाईक अथवा शेजारीच असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेनंतर महिलेने स्वत:ची सुटका करून घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते.(four children mother rape bye neighbor mujffarpur bihar crime story)

ADVERTISEMENT

बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपुर येथील मनियारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला तिच्या माहेरी एका लग्नासमारंभासाठी आली होती. रविवारी पीडित महिला तिच्या घरात झोपली होती. या दरम्यान तिचा 24 वर्षीय शेजारी घरात घुसला आणि त्याने दोरीने महिलेचा हाथ-पाय बांधुन आणि तोंड दाबून तिचा बलात्कार केला. महिलेवर बलात्कार केल्यानंतर तरूणाने पळ काढला होता. त्यानंतर महिलेने लगेचच स्वत:ची सुटका करून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काय हाती लागला नाही. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. आरोपी तरूण यानंतर त्याच्या घरी जाऊन लपला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याला ताब्यात घेतले.

हे ही वाचा : चॉकलेट समजून सापालाच खाल्लं, नंतर 3 वर्षाच्या चिमुकल्याला…

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण झाल्यावर आणि मुलांना झोपवून मी झोपायला गेले होते.यावेळी घराचे दरवाजे बंद होते. मात्र दरवाजा खाली एक खड्डा होता. ज्यावर विट लावण्यात आली होती. ही विट बाजूला करून आरोपी घऱात शिरला आणि त्याने माझे हात-पाय बांधुन आणि तोंड दाबून बलात्कार केला. यानंतर त्याने घरातून पळ काढला होता.

हे वाचलं का?

एसएसपी राकेश कुमार यांना दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडलीह होती.याप्रकरणी एका तरुणाला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तरुणाने घरात घुसून महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. महिलेला मेडीकल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : मोबाइल गेममधून सुरु होतं मुलांचं धर्मांतर, काय आहे मुंब्रा कनेक्शन?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT