Crime : ज्याच्यासाठी मायबापाला सोडलं, त्यानेच मित्रांसोबत मिळून केला गँगरेप

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Gang raped by the lover and his friends of a girl who ran away from home during a love affair.
Gang raped by the lover and his friends of a girl who ran away from home during a love affair.
social share
google news

Gang rape : त्याच्यावर जीव जडला. दोघांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. इतकंच नाही, तर तिने त्याच्यसाठी घरदार सोडलं. अगदी मायबापालाही मागे सोडून ती घरातून पळून गेली. पण, घडलं वेगळंच. ज्याच्यासाठी ती सगळं सोडून आली, त्यानेच कधीही न विसरता येणारा आघात केला. मित्रांसोबत मिळून आळीपाळीने तिच्या अब्रूचे लचके तोडले. (Girl ran away from home for marriage, boyfriend gang-raped her with friends)

ADVERTISEMENT

सामूहिक बलात्काराची ही घटना घडली आहे बिहारमधील बेगुसरायमध्ये. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर तरुणी घरातून पळून गेली. पण, तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. पोलीस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत. पीडित तरुणी खगरिया जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

खगरिया जिल्ह्यात राहणारी एक तरुणी 25 ऑक्टोबरला तिचा प्रियकर संतोष कुमारसोबत लग्न करण्यासाठी घरातून पळून गेली होती. 26 ऑक्टोबरला तिचा प्रियकर तिला एका घरात घेऊन गेला. तिथे त्याने आणि त्याच्या पाच मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हे वाचलं का?

मित्रांसह प्रियकराचा प्रेयसीवर सामूहिक बलात्कार

पीडितेने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला आणि गस्तीवर असलेल्या पोलिसांना भेटली. तिने पोलिसांना घडलेला अतिप्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तिचा बॉयफ्रेंड संतोष कुमार, नितीश कुमार आणि संजीव कुमार यांना अटक केली. तर अन्य तीन आरोपी आकाश कुमार, भोला कुमार आणि छोटू कुमार पळून जाण्यात यशस्वी झाले.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ भाजपने पुन्हा टाकला, कारण आलं समोर

पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले. या प्रकरणाबद्दल एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, प्रेमप्रकरणात अडकलेल्या तरुणीवर तिचा प्रियकर संतोष कुमार आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिच्या प्रियकरासह तीन आरोपींना अटक केली.

ADVERTISEMENT

सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन आरोपी फरार

या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले असून, त्यांना पकडण्यासाठी बखरी डीएसपी चंदन कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बेगुसराय येथील सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर तरुणी खूपच घाबरली असून, तिने आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT