तरुणीवर अत्याचार करुन गेला तुरुंगात, जामिनावर बाहेर येताच पुन्हा त्या तरुणीला गाठलं अन् केलं कांड
सहा वर्षांपूर्वी पीडितेशी आरोपीचे प्रेमसंबंध जुळले होते. यादरम्यान त्याने तरुणीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार अत्याचार केले. या काळात पीडिता तीन वेळा गर्भवती राहिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीवर अत्याचार करुन गेला तुरुंगात,
जामिनावर बाहेर येताच पुन्हा त्या तरुणीला गाठलं अन् केलं कांड
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगवास भोगून आलेल्या आरोपीने बाहेर पडताच पुन्हा त्याच तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले, ज्यामुळे ती चौथ्यांदा गर्भवती राहिली आहे. आता आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडितेने पुन्हा पोलिसांत धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे.
शारीरिक संबंधावेळी बनवला व्हिडिओ
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर नावाचा हा तरुण एका स्थानिक शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी पीडितेशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. यादरम्यान त्याने तरुणीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार अत्याचार केले. या काळात पीडिता तीन वेळा गर्भवती राहिली, मात्र आरोपीने तिला धमकावून आणि विविध रुग्णालयांत नेऊन तीनही वेळा तिचा गर्भपात घडवून आणला होता.
हे ही वाचा : पुणे : कपडे बदलत असताना मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, 'त्या' कपड्याच्या दुकानात काय घडलं?
पश्चातापाचे नाटक
यापूर्वी, 14 डिसेंबर 2024 रोजी आरोपीने दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे सांगून पीडितेची फसवणूक केली. त्यावेळी पीडितेने हिंमत दाखवून 31 जानेवारी 2025 रोजी तक्रार दाखल केली, ज्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा आपला जुना खेळ सुरु केला. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाल्याचे नाटक करत आणि जुन्या केसेसमध्ये तडजोड करण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेशी पुन्हा जवळीक साधली.
हे ही वाचा : लग्नानंतर नवऱ्याने फक्त एकदाच ठेवले शारीरिक संबध, बायकोच्या हाती लागली 'ती' फाईल अन् घडलं भयानक कांड
पुन्हा शरीरसंबंध
6 डिसेंबर 2025 रोजी आरोपीने पुन्हा तरुणीशी शरीरसंबंध ठेवले, ज्यातून ती आता पाच महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने जेव्हा लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा प्रभाकरने पुन्हा एकदा आपला रंग बदलला आणि लग्नास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोरखनाथ क्षेत्राचे सीओ रवी सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील.









