CA सोबत आंतरजातीय विवाह, छळ आणि ज्योतिषी.. 24 वर्षीय जागृतीचं आयुष्य कसं संपलं?
'वर्ल्डमार्क मॉल'च्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जागृती बारी नावाच्या 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाला पोलिसांच्या हाती लागलेल्या मोबाईल चॅट्समुळे एक वेगळे वळण मिळाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CA सोबत आंतरजातीय विवाह, छळ आणि ज्योतिषी..
24 वर्षीय जागृतीचं आयुष्य कसं संपलं?
Crime News : हरियाणातील गुरुग्राममधील 'वर्ल्डमार्क मॉल'च्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जागृती बारी नावाच्या 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणाला पोलिसांच्या हाती लागलेल्या मोबाईल चॅट्समुळे एक वेगळे वळण मिळाले आहे. जागृती गेल्या अनेक दिवसांपासून एका ज्योतिषाच्या संपर्कात होती. ती लपून-छपून त्या ज्योतिषाकडून आपला संसार वाचवण्यासाठी, घरातील छळ आणि सासरच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारत होती. तिने अनेक तोडगे आणि तंत्र-मंत्रही करून पाहिले; मात्र जेव्हा सर्व उपाय अपयशी ठरले तेव्हा आशेचा शेवटचा किरणही नाहीसा झाला आणि तिने मृत्यूला कवटाळले.
2023 मध्ये आंतरजातीय विवाह
जागृतीचा 22 नोव्हेंबर 2023 रोजी अमित सिंघल या सीए असलेल्या तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता. हा एक आंतरजातीय विवाह होता. अमितच्या घरचे या लग्नाच्या पूर्णपणे विरोधात होते आणि याच कारणामुळे लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच जागृतीला टोमणे, मानसिक छळ आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. जागृतीचा भाऊ हार्दिकने पोलिसांना सांगितले की, तिचा पती आणि सासरचे लोक तिला इतकी अमानुष मारहाण करायचे की तिच्या शरीरावर निळे डाग पडायचे. काही दिवसांपूर्वीच जेव्हा तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला, तेव्हा तिने घाबरून आपल्या शरीरावरील जखमांचे फोटो काढून बहिणीला व्हॉट्सॲपवर पाठवले होते. हे फोटो आता पोलिसांनी पुरावा म्हणून वापरले आहेत.
हे ही वाचा : गर्भवती बायकोच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हॅक्सॉ ब्लेड अन् नंतर.., 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर काय घडलं?
डिजिटल हेरगिरी
अमित जागृतीवर सतत संशय घ्यायचा. तो 24 तास जागृतीचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करायचा. ती कधी ऑफिसला पोहोचते, कधी निघते आणि कोणाला भेटते याची सर्व माहिती तो घ्यायचा. इतकेच नाही तर, तो दररोज जागृतीच्या फोनचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासायचा. या डिजिटल हेरगिरीमुळे आणि सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे जागृती आतून पूर्णपणे खचून गेली होती. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी तिला शेवटचा आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे ज्योतिषी. मात्र तिची ही आशादेखील फोल ठरली.
हे ही वाचा : विवाहित महिलेला प्रपोज केलं, नकार दिल्याने झोपल्यानंतर फेकलं अॅसिड, भयंकर प्रकरण!
..अखेर सहनशीलता संपली
अखेर जागृतीची सहनशीलता संपली. तिला आपले आयुष्य नकोसे वाटू लागले. तारीख होती 13 मे. ती नेहमीप्रमाणे वर्ल्डमार्क मॉल येथील तिच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिने रीतसर ऑफिसच्या सिस्टममध्ये आपली हजेरी (Attendance) नोंदवली. मात्र यानंतर ती लगेचच बाल्कनीच्या दिशेने गेली आणि तिने पाचव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. इतक्या उंचावरून पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतकेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपी पती अमित सिंघल याला अटक केली आहे.









