Crime : बहिणीसोबत होते संबंध, कंडोमच्या पाकिटाने कसं सोडवलं हत्येचे गूढ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

a person's body was found in a school in Bhitridih village under Bewana police station under Ambedkar Nagar district. Condom Packet
a person's body was found in a school in Bhitridih village under Bewana police station under Ambedkar Nagar district. Condom Packet
social share
google news

UP Crime News: पोलिसांना शाळेजवळ एक मृतदेह सापडला. मृतदेह जळलेल्या अवस्थेत होता. आणि आजूबाजूला काहीही नव्हतं. त्याचवेळी पोलिसांची नजर पडली कंडोमच्या पाकिटावर. याच कंडोमच्या पाकिटाने हत्या करणाऱ्या आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचवलं. यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी फक्त कंडोमचं पाकिट पुरावा म्हणून मिळाल्यानंतर केलेला तपास उल्लेखनीय आहे.

ADVERTISEMENT

ही घटना आहे उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील. 11 जून रोजी आंबेडकर नगर जिल्ह्यातील बेवना पोलीस स्टेशन अंतर्गत भित्रीडीह गावातील शाळेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. मृतांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले होते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या जागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांना कंडोमचे पाकीट सापडले.

घटनास्थळावरून फक्त कंडोमच्या पाकिटाशिवाय काहीच न सापडल्याने हे प्रकरण पोलिसांसमोर आव्हान बनून उभे राहिले. त्यांना काहीच सुगावा लागत नव्हता. मृताची ओळख पटू शकत नव्हती आणि इतर कोणतेही पुरावे सापडत नव्हते.

हे वाचलं का?

ब्रँडचे कंडोम कुठे मिळते?

आता पोलिसांकडे पुरावा म्हणून फक्त कंडोमचे पाकीट होते. तपासात असे आढळून आले की या ब्रँडचे कंडोम दिल्ली एनसीआरमध्ये उपलब्ध असतात. यासोबतच पश्चिम यूपीमध्येही या ब्रँडचे कंडोम उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हे कंडोम उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पुरवले जातात याची माहिती पोलिसांनी घेतली. नंतर पोलिसांनी हा शोध घेण्याचा प्रयत्न केला की, आंबेडकर नगर जिल्ह्यातील कोणत्या केमिस्ट शॉप आणि जनरल स्टोअरच्या दुकानांना अलीकडच्या काही दिवसांपासून हे कंडोम पुरवले जात आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!

पोलिसांनी याचीही चौकशी केली की, अलिकडच्या काळात हे कंडोम कुणी कुणी विकत घेतले होते. पण, इतकं करुनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. कारण दुकानदारांकडून ही माहिती काढणे खूप अवघड होते, कारण कोणत्याही दुकानदाराकडे त्याच्या बहुतांश ग्राहकांची माहिती नसते.

ADVERTISEMENT

दुसरा मार्ग अवलंबला

पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणावरून कोण कोणत्या नंबरवरून कॉल केले गेले याची माहिती मिळवली. त्यातून घटनास्थळी किती क्रमांक वापरले गेले हेही समोर आले आणि या सिमकार्डच्या मालकांचा पत्ता काय आहे? हेही पोलिसांना कळले.

इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सचेही विश्लेषण करण्यात आले. या क्रमांकांच्या ठिकाणांची बारकाईने पडताळणी करण्यात आली. घटना घडली त्या वेळी हे मोबाईल क्रमांक किती काळ तिथे होते आणि किती दिवसांनी त्यांचे मोबाईलचे लोकेशन बदलले, याचा तपास पोलिसांनी केला.

पोलीस आरोपींपर्यंत कसे पोहोचले?

आंबेडकर नगरला (जिथून त्याच ब्रँडचे कंडोम विकले जातात) लागून असलेल्या जिल्ह्यांतील मोबाईल क्रमांक किती काळ हत्या झालेल्या ठिकाणी होते, याचा तपास करण्यात आला. हे एक कठीण काम होते, कारण असे बरेच नंबर होते, जे घटनास्थळी दाखवत होते आणि पुढे निघून गेल्याचे तपासात दिसले. त्यामुळे नक्की कोणते नंबर आरोपींचे आहेत, हे शोधणे खूप क्लिष्ट काम होते. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मृत्यूची अंदाजे वेळ क्रमांकांच्या स्थानाशी जुळवली.

जेव्हा ही घटना घडली. त्यावेळी घटनास्थळी शेकडो फोन नंबर चालू होते. प्रत्येक मोबाईलचे लोकेशन प्रत्येक क्षणी बदलत होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही नवीन मोबाईल लोकेशन्स एंट्री होत होती, तर काही EXIT होती. ज्या भागात हे कंडोम मिळतात, तेथून कोणत्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे घटनास्थळी झालेल्या घटनेच्या वेळेशी जुळतात. याचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >> Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…

हळुहळू तपास करत असताना पोलिसांना अशा चार क्रमांकांची माहिती मिळाली, ज्यांचे लोकेशन घटना घडली त्यावेळी बराच काळ तिथे होते.

पोलिसांनी या क्रमांकांची तपासणी केली. या क्रमांकांच्या सिमकार्डचे पत्ते आणि त्यांचा वापर करणाऱ्यांचा शोध घेतला. यातील एक नंबर बंद होत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

चार नंबर निघाले सहारनपूरमधील

या चार नंबरचे मालक सहारनपूरचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस त्यांच्या घरी पोहोचले असता चौघे सर्कस पाहण्यासाठी गेल्याचे कळले. नंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना पकडून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घटनेची कबुली दिली.

आरोपींनी का केली हत्या?

अजबसिंह रंगीला असे मृताचे नाव असल्याचे अखेर समोर आले. आरोपींपैकी एक असलेल्या इरफानच्या बहिणीसोबत मृत अजबसिंग रंगीलाचे प्रेमसंबंध होते. ही बाब आरोपींना आवडली नाही. या बहाण्याने तो सर्कस दाखवण्यासाठी अजबला घेऊन बाहेर पडला. दरम्यान, आरोपींनी अजबसिंहला दारू पाजली आणि नंतर त्याची हत्या केली. आरोपींनी अजबसिंहच्या खिशातून सर्व वस्तू काढून घेतल्या आणि कंडोमचे पाकीट जागेवरच फेकले. केवळ या चुकीने आरोपी कायद्याच्या बेडीत अडकले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT