पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून गोळीबार, अहिल्यानगर फायरिंग प्रकरणातील आरोपी कोल्हापुरात कसे पोहोचले?

अहिल्यानगरमध्ये गोळीबार करुन फरार झालेल्या दोन आरोपींना कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

ADVERTISEMENT

Kolhapur Crime
Kolhapur Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अहिल्यानगरमधील आरोपींना कोल्हापुरात अटक

point

गोळीबार केल्यानंतर झाले होते फरार

point

नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Crime : अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली आहे. अभिषेक चव्हाण आणि हरण चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही पोलिसांपासून वाचण्यासाठी कोल्हापुरात लपून बसले होते.

दहा जणांनी केला हल्ला

10 नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नागफणी येथे ही गोळीबाराची घटना घडली होती. पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार कल्याण चव्हाण आणि त्याच्या दहा साथीदारांनी रमेश भोसले यांच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपींनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रमेश भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : भाजपचा छोट्या भावांनी गेम केला, पडद्याआड काय घडलं?

अहिल्यानगर ते कोल्हापूर

या घटनेनंतर पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने अभिषेक चव्हाण आणि हरण चव्हाण हे दोघेही कोल्हापुरात पळून आले होते. ते गोकुळ शिरगाव परिसरातील कणेरी-माधवनगर येथे लपून राहत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील आणि उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली.

हे ही वाचा : Weather Update: नोव्हेंबरमध्येही उन्हाचा चटका कायम! मुंबईसह राज्याचं तापमान जाणार तब्बल...

कसे सापडले आरोपी?

दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही कणेरी-माधवनगर परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना अहिल्यानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुरव, सत्यजित तानगुडे, विशाल खराडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.