Crime: चंद्रपूरमध्ये भाजप नेत्याच्या पत्नीची चुकून हत्या, नेमकं काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

indiscriminate firing in chandrapur bjp leader Sachin Dohe Wife shot dead
indiscriminate firing in chandrapur bjp leader Sachin Dohe Wife shot dead
social share
google news

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजापूर शहरात पूर्व वैमनस्यातून अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात भाजप नेत्याच्या (BJP leader) पत्नीची चुकून गोळी लागून दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत लल्ली नावाच्या तरूणावर हल्ला करण्यासाठी आले होते.मात्र भाजप नेत्याच्या पत्नीची चुकून या हल्ल्यात गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. तर लल्ली हा जखमी झाला आहे. या अंदाधुंद गोळीबारामुळे शहरात एकच खळबळ माजली असून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी (Police) अज्ञातांवर गुन्हा दाखल करून घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे. (indiscriminate firing in chandrapur bjp leader wife shot dead chandrapur crime story)

ADVERTISEMENT

राजापूर शहरात लल्ली नावाच्या तरूणाला मारण्यासाठी काही तरूण बंदुका घेऊन आले होते. अज्ञात हल्लेखोर घटनास्थळी पोहोचताच लल्लीने भाजप नेते (BJP leader) सचिन डोहे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी लल्लीला जीवे मारण्यासाठी अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली होती. या गोळीबाराचा आवाज ऐकूण भाजप नेत्याच्या पत्नी पुर्वाशा घराबाहेर पडल्या होत्या. ज्यामुळे अंदाधुंद गोळीबारात त्यांना दोन गोळ्या छातीत लागल्या आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. यावेळी भाजप नेत्याच्या घरात घुसणाऱ्या लल्लीच्या पाठीवर एक गोळी लागली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या अंदाधुंद गोळीबारानंतर अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.

हे ही वाचा : Pune Crime: रस्त्यात गाठलं, नंतर…; पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून काढला काटा

दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ दोघांना रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी पुर्वाशा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पुर्वाशा यांना दोन लहान मुले आहेत, आणि तिचे पती सचिन डोहे हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर या घटनेत जखमी झालेल्या लल्लीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

हे वाचलं का?

दरम्यान भाजप नेत्याच्या (BJP leader) घरानजीक झालेल्या या अंदाधुंद गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. मात्र तरीही या हल्ल्यामागचं ठोस कारण शोधले जात आहे. यासोबत या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT