बँकेत काम करणाऱ्या पायलसोबत भयंकर घडलं, अपघात वाटत असतानाच वेगळाच खुलासा!
Indore crime news : इंदौरमध्ये बँक कर्मचाऱ्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर तपासाला धक्कादायक वळण मिळाले. पोस्टमार्टम, एफएसएल तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्या उघडकीस आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बँकेत काम करणाऱ्या पायलसोबत भयंकर घडलं
अपघात वाटत असतानाच वेगळाच खुलासा!
Indore crime news : इंदौरमधील खजराना परिसरातील तपेश्वरी बाग कॉलनीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. 26 जुलै रोजी भाड्याच्या घरामध्ये राहून बँकेत काम करणाऱ्या पलक काशिव यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. खोलीत सर्वत्र धूर पसरलेला होता आणि जळालेल्या सामानाच्या खुणा दिसत होत्या. घटनास्थळ पाहता सुरुवातीला ही घटना गॅस गळतीमुळे झालेला अपघात किंवा आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र पोलिसांनी कोणताही घाईघाईने निष्कर्ष न काढता तपास सुरू ठेवला. त्यानंतर आलेल्या पोस्टमार्टम अहवालाने संपूर्ण प्रकरणालाच वेगळे वळण दिले.
गळा दाबून हत्या अन् पायलचा मृतदेह जाळला
पलक गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हत्या. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात असतानाच त्यांचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टेम अहवालात पलक यांचा मृत्यू आगीमुळे झाला नसून त्यापूर्वीच गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली होती. यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. खजराना पोलीस ठाण्याच्या पथकाने एफएसएलच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.
हेही वाचा : प्रियकराशी बोलताना गोंधळ घालायचा, आईने निष्पाप मुलाला संपवलं, पतीने महिन्याने केला उलगडा
