युवकाला चाकूने 30 वेळा भोसकले, भयंकर घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Jail constable son stabbed on street carnage caught on cctv
Jail constable son stabbed on street carnage caught on cctv
social share
google news

Bihar News : नवादा जिल्ह्यामध्ये महिला कॉन्स्टेबलच्या (Lady Constable) एकुलत्या एक मुलाची चाकूने निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नवादा येथील केएलएस कॉलेजजवळ त्याची हत्या करण्यात आली आहे. शहरातील शिवनगरमधील पोस्टमॉर्टम रोड परिसरात राहणारा वासुदेव साव यांचा मुलगा राहुल कुमार असं त्या मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुल याची आई गया देवी या मुंगेर तुरुंगामध्ये (Munger Jail) कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत असतात.

ADVERTISEMENT

डोळ्यात मिरची पूड फेकली

घटनेच्या वेळी केएलएस कॉलेजचा विद्यार्थी राहुल हा कॉलेज कॅम्पसमधून नवाडाकडे पायी जात होता. त्यावेळी तो एका झाडाजवळ पोहचलेला असतानाच तोंडावर कापड बांधलेला हल्लेखोर राहुल आला. त्याने पिशवीतून आणलेली मिरचीची पूड त्याच्या डोळ्यात टाकली. त्यानंतर त्या हल्लेखोराने राहुलवर चाकूने सुमारे 20 ते 25 वार केले. त्या हल्ल्यातच राहुलच मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी या प्रकरणाची चौकशीला सुरुवात केली.

 

हे वाचलं का?

वार थांबवलेच नाहीत

ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हल्ला करणाऱ्याच्या सर्व हालचालीही सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. या घटनेची माहिती सांगताना असंही सांगितले जात आहे की, हल्लेखोर राहुल झाडाजवळ येण्याआधीच तो तिथं थांबला होता. राहुल तिथे येताच हल्लेखोराने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि त्याच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Aditya L1 मोहिमेत मोठं यश! SUIT ने पाठवलेले सूर्याचे 11 फोटो पाहिलेत का?

हल्लेखोराने शांतपणे संपवले

राहुलवर चाकूने वार केल्यानंतर त्या हल्लेखोराने त्याची नाडीही तपासली, त्यानंतर तो तिथून शांतपणे निघून गेला. रस्त्याकडेला ही घटना घडत असतानाही तिथे कोणीही मध्यस्थी केली नाही. पोलिसांनाही या घटनेची माहिती तात्काळ दिली नाही. राहुल हा वाराणसीच्या बीएचयूमध्ये शिकत असून तो छठ उत्सावासाठी घरी आला होता. घरी असताना त्याला कोणाची तरी फोन आला आणि तो घरातून बाहेर पडला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सीसीटीव्ही पाहून आरोपीचा शोध घेणे सुरु केले आहे. हल्लेखोराची अजून ओळख पटलेली नसून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची नेमणूक करून शोध चालू केला आहे.

ADVERTISEMENT

राहुलला मदत मिळाली नाही

राहुलवर हल्ला झाला त्यावेळी बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरू होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे त्याच्यावर चाकूने हल्ला झाल्यानंतर त्याने आरडाओरड केल्यानंतरही त्याला कोणाची मदत मिळू शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी बेशुद्ध पडलेल्या राहुलला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा >> Mumbai Crime : बायकोला मारतच सुटला, जीव जाईपर्यंत सोडलं नाही; नवऱ्याने का केली हत्या?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT