पतीचे हात पाय बांधले, नंतर 7 जणांनी स्पॅनिश महिलेवर आळीपाळीने केला बलात्कार

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'त्या' रात्री काय घडलं? पीडित महिलेने सांगितली आपबीती

point

तिघांना अटक, चार आरोपींचा शोध सुरू

point

भाजपने राज्य सरकारला घेरले

Jharkhand Crime News : झारखंडमधील (Jharkhand) दुमका येथे शुक्रवारी (01 मार्च) रात्री एका स्पॅनिश महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आता या भयावह प्रकरणाबाबत पीडित महिलेने स्वत: अंगावर काटा आणणारी कहाणी सांगितली आहे. 

ADVERTISEMENT

'त्या' रात्री काय घडलं? पीडित महिलेने सांगितली आपबीती

स्पॅनिश पीडित महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, 'ज्यावेळी हे सर्व घडलं तेव्हा सात जण तिला सतत लाथा-बुक्या मारत होते. एवढंच नाही तर, आरोपींनी तिच्या पतीचे हात बांधून त्यालाही मारहाण केली.'

ती महिला म्हणाली, 'मला वाटलं की आरोपी मला त्या रात्री मारून टाकतील पण देवाच्या कृपेने मी अजून जिवंत आहे.' दुमका येथील हंसदिहा पोलीस स्टेशन परिसरात स्पॅनिश महिलेसोबतची ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी स्वत: घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला.

हे वाचलं का?

28 वर्षीय स्पॅनिश महिला आणि तिचा 64 वर्षीय पती बांगलादेशातून वेगवेगळ्या बाइक टूरवर निघाले होते आणि झारखंडमार्गे नेपाळला जात होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर स्पॅनिश महिलेला सरैयाहाट सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ ही घटना घडली.

तिघांना अटक, चार आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणासंदर्भात एसपी पितांबर सिंह खेरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सात जणांपैकी तिघांना बेड्या ठोकण्यात यश आलं असून उर्वरित चौघांना लवकरच पकडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "इतर चार आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे, त्यांना लवकरच पकडण्यात येईल." खेरवार म्हणाले, 'पोलीस नवी दिल्लीतील स्पेनच्या दूतावासाच्या संपर्कात आहेत.'

ADVERTISEMENT

भाजपने राज्य सरकारला घेरले

झारखंडमध्ये परदेशी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत भाजपनेही राज्य सरकारला घेरलं आहे. या घटनेबद्दल भाजप आमदार अनंत ओझा म्हणाले, 'हे राज्यासाठी लांच्छनास्पद आहे आणि राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था दर्शवते. इथे परदेशी लोकही सुरक्षित नाहीत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी आणि सरकारनेही याची दखल घ्यावी. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.' अशी टीकाही भाजपने राज्य सरकारवर केली.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT