कल्याण : 9 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

Kalyan Crime News : टिटवाळ्यात नऊ वर्षीय चिमुरडीच्या विनयभंगप्रकरणी ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कल्याण : 9 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग

point

पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

Kalyan Crime News  : टिटवाळा परिसरात नऊ वर्षीय चिमुरडीच्या विनयभंगाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गणेश परदेशी नामक पोलीस कर्मचाऱ्याविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : पंढरपूर हादरले, शिवा संघटनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, वर्दळीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार

गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश परदेशी हा ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. पीडित नऊ वर्षीय मुलगी ही आरोपीची नातेवाईक असल्याची माहिती आहे. या मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीशी संबंधित हे प्रकरण असल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या वर्तनाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : मुंबई : लोकल ट्रेन सुरु झाली अन् नाशिकच्या तरुणाने फेकून मारला चाकू, पुढं काय घडलं?

संबंधित पोलीस कर्मचारी फरार असल्याची माहिती

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी फरार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपीचा शोध घेऊन त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर प्रकरण असल्याने या तपासाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करीत आहेत.