पत्नीसह दोन मुलांचं बॅटनं डोकं फोडलं, तिहेरी हत्याकांडानं ठाणे हादरलं
कौटुंबीक वादातून नवऱ्याने पत्नीसह दोन लहान मुलांवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला करून तिघांची हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. तिघांची हत्या करून आरोपी हरियाणात पळून गेला होता, मात्र ठाणे पोलिसांनी त्याला हरियाणातील हिसारमधून ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
Thane Crime: गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. नुकताच ठाण्यातील कासारवडवली भागातील एक चाळीत राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या पत्नीची व मुलाची क्रिकेटच्या बॅटने मारून (Cricket Bat Beaten) हत्या (Murder) केली असल्याचे घटना उघडकीस आली आहे. पत्नी व मुलाची हत्या करून आरोपी हरिणातील हिसारला पळून गेला होता, मात्र पोलिसांनी हिसारमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 21 डिसेंबर रोजी घडली होती, मात्र घटना घडून दोन दिवस झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव अमित बागडी नाव असून ही हत्या त्याने घरातच केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
आरोपीला हरिणायातून ताब्यात
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भागडीची पत्नी भावना बागडी त्याचा 8 वर्षाचा मुलगा अंकुश आणि सहा वर्षाची मुलगी खुशी ही सर्वजण ठाण्यातील कासारवडवलीमधील एका चाळीत राहत होती. मात्र या तिघांची हत्या करून आरोपी अमित हा हिसारला पळून गेला होता.
हे ही वाचा >> WFI Suspended : मोदी सरकारचा तडकाफडकी निर्णय! कुस्ती महासंघ कार्यकारिणी बरखास्त
खोलीत रक्ताचा सडा
पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह त्यांच्या खोलीत मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र आरोपीचा पत्ता लगेच सापडून आला नसल्याने त्याचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासानंतर तो हरियाणामध्ये पळून गेल्याचे समल्याने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
हे वाचलं का?
पत्नीसह मुलांवर बॅटनं हल्ला
पोलीस उपअधीक्षक शिवराज पाटील यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, कौटुंबीक वादातून पत्नीसह मुलांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीने क्रिकेटच्या बॅटने पत्नीसह मुलांची हत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पत्नी आणि मुलांच्या डोक्यात बॅटने मारहाण करून त्यांचे डोकी फोडली होती. त्यानंतर आरोपी पसार झाला होता.
दोन दिवसांनी आरोपीचा शोध
कौटुंबीक वादातून पत्नीसह मुलांची हत्या करून पती फरार झाल्यानंतर त्याच्या भावाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीचा तपास सुरू करण्यात आला होता, मात्र घटना घडून दोन दिवस झाल्यानंतर आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. आता या प्रकरणाचे नेमकं कारण समजेल असं पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sunil Kedar : काँग्रेसला मोठा झटका! सुनील केदार यांची आमदारकी रद्द
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT