हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकलं कुटुंब, आरडाओरडा केला तरी स्टाफ आलाच नाही; बायको आणि मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू
RG Kar Hospital Accident : या रुग्णालयात शुक्रवारी (20 मार्च) पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. अरूप बॅनर्जी यांचा रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या उपचारासाठी आलेल्या वडिलांवरच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल दुरुस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकलं कुटुंब,
आरडाओरडा केला तरी स्टाफ आलाच नाही;
बायको आणि मुलाच्या डोळ्यादेखत वडिलांचा तडफडून मृत्यू
RG Kar Hospital Accident : तुम्हाला आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय आठवतंय का? पश्चिम बंगालच्या कोलकत्ता मधील एका हादरवून टाकणाऱ्या बलात्कार प्रकरणानं सबंध देशभर हे चर्चेत आलेलं. त्याच ठिकाणी अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात शुक्रवारी (20 मार्च) पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. अरूप बॅनर्जी यांचा रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या उपचारासाठी आलेल्या वडिलांवरच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल दुरुस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड
अरूप बॅनर्जी पहाटे 5 च्या सुमारास पत्नीसह मुलावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले होते. चौथ्या मजल्यावर उपचार आटोपून खाली येत असताना हा अपघात घडला. तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरले, मात्र तिथे कोणताही अधिकृत लिफ्टमन हजर नव्हता. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट तळमजल्यावर न थांबता थेट बेसमेंटमधील रेडिओलॉजी युनिटच्या शाफ्टमध्ये जाऊन कोसळली. या अनपेक्षित धक्क्याने बॅनर्जी कुटुंब पूर्णपणे हादरून गेले.
हे ही वाचा : शुक्र आणि शनीची युती! 'या' तीन नशीबवान राशींना मिळणार अपार यश आणि सुख; तुमचे सोन्याचे दिवस सुरु
मदतीसाठी टाहो, पण प्रतिसाद मिळेना
लिफ्ट एका निर्जन आणि बंद भागात अडकल्याने कुटुंबाने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. लिफ्टमधील इमर्जन्सी अलार्म किंवा संवादाचे कोणतेही साधन कार्यान्वित नव्हते. जिवाच्या आकांताने त्यांचा मुलगा लिफ्टच्या वेंटिलेशनच्या छोट्या जागेतून कसाबसा बाहेर पडला आणि मदतीसाठी धावला. मात्र, रुग्णालय कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडण्यास बराच वेळ लागला. जेव्हा अरूप यांना बाहेर काढण्यात आले, तेव्हा ते बेशुद्ध पडले होते आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा : NCP च्या आणखी एका नेत्याची विकेट, खरातची साथ सोबत भोवली... रुपाली चाकणकरांनी अखेर दिला राजीनामा
पोलिस तपास आणि निष्काळजीपणाचा ठपका
पोलिसांनी या प्रकरणी 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) टीम लिफ्टच्या तांत्रिक बिघाडाची चौकशी करत आहे. प्राथमिक तपासात लिफ्ट ऑपरेटरची अनुपस्थिती आणि आपत्कालीन यंत्रणेचे अपयश समोर आले आहे. अरूप बॅनर्जी यांचा मृत्यू लिफ्टच्या धक्क्याने झाला की गुदमरून, हे पोस्ट मार्टम अहवालानंतरच स्पष्ट होईल. सध्या पोलीस रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत.










