धक्कादायक! पर्यटनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचं आधी अपहरण, नंतर…
लोणावळामध्ये पर्यटनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारण अल्पवयीन मुलगी पर्यटनासाठी आलेली असताना तिचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला.
ADVERTISEMENT
Gang Rape: पर्यटनासाठी लोणावळा प्रसिद्ध असल्याने तिथे रोज असंख्य पर्यटक भेट देत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून लोणावळा आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. लोणावळा (Lonawala) येथे एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पर्यटनसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे एक गॅंगकडून अपहरण (Kidnapping) करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दहा जणांच्या टोळीमधील 4 आरोपींना पोलिसात ताब्यात घेतले आहे. यामधील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचेही पोलिसांनी सांगितले. (lonaval gang rape minor girl came for tourism raped)
ADVERTISEMENT
अपहरण करुन मारहाण
अल्पवयीन मुलगी पर्यटनासाठी लोणावळ्यात आली होती. त्यावेळी टोळीकडून तिचे अपहरण करुन तिला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कारही करण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अल्पवयीन मुलीची सुटका करुन कारवाई करत दहा पैकी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा >> मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात
साखळी बांधून मारहाण
पर्यटनासाठी आलेली अल्पवयीन मुलगी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबली होती. त्यावेळी तिचे दुचाकीवरून अपहरण करुन तिला एका खोलीत डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. ही घटना हनुमान टेकडी परिसरातील घरात घडली आहे. यावेळी धक्कादायक बाब म्हणजे मुलीला साखळीने बांधून ठेवण्यात आले होते.
हे वाचलं का?
मुलीच्या आईची धाव
लोणावळ्यातील हनुमान टेकडीवरील एका घरात तिला डांबून ठेवून मारहाण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती मुलीच्या आईने पोलिसांना दिली. त्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसांना दिली.
आरोपी लोणावळ्याचेच
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बेताब आनंद पवार, मंदा बेताब पवार, संजना बबलू पवार, बबलू पवार, अर्चना बेताब पवार, किरण बेताब पवार, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे, करीना राज शिंदे हे सर्वजण क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पालकमंत्रीपदाचा पेच! अजित पवारांना हवेत ‘हे’ 3 जिल्हे, पण शिंदेंचा विरोध
दोघांना पोलीस कोठडी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपींपैकी राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ताब्यात घेतलेल्या चार पैकी दोघं अल्पवयीन असल्याने त्यांना सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT