तीन महिलांसोबत केलं लग्न अन् तब्बल वर्षभरापासून आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य... नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

एका व्यक्तीवर त्याने त्याच्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी व्यक्तीने तीन वेळा लग्न केलं असून त्याच्या दुसऱ्या पत्नीनेच पतीवर हे आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

वर्षभरापासून आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य...
वर्षभरापासून आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तीन महिलांसोबत केलं लग्न अन्...

point

तब्बल वर्षभरापासून आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य

Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर त्याने त्याच्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी व्यक्तीने तीन वेळा लग्न केलं असून त्याच्या दुसऱ्या पत्नीनेच पतीवर हे आरोप केले आहेत. आरोपीच्या पत्नीने पोलिसात जाऊन यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. 

तीन महिलांसोबत केलं लग्न...

महिलेच्या आरोपानुसार, तिच्या पतीने तीन लग्नं केली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने दुसरं लग्न केलं आणि नंतर, तिसऱ्यांना सुद्धा एका महिलेसोबत त्याने लग्न केलं. लग्नानंतर, त्यांना दोन मुली झाल्याचं दुसऱ्या पत्नीने सांगितलं. तसेच, तिसऱ्या पत्नीपासून सुद्धा त्याला मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. वडीलच आपल्यासोबत घाणेरडं कृत्य करत असल्याचं पीडित मुलींनी त्यांच्या आईला सांगितलं. 

आपल्याच मुलींसोबत घृणास्पद कृत्य 

खरंतर, हे प्रकरण गोरखपुरच्या तिवारीपुर पोलीस स्टेशन हद्दीतील दाऊद चद परिसरातील असल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या दुसऱ्या पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने तक्रारीत सांगितलं की तिचा पती आपल्याच दोन अल्पवयीन मुलींची छेड काढत असून त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करतो. 

संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीला दारूचं व्यसन असून घराची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताची आहे. आरोपी तरुण हा घरांमध्ये जाऊन वीज दुरुस्तीचं काम करतो. तो नेहमी दारू प्यायल्यानंतर घरी येऊन आपल्या मुलींसोबत घृणास्पद कृत्य करायचा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp