Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! 12 वर्षाच्या मुलीने सोडला जीव
A girl was murdered in Tisgaon area of Kalyan East. The accused killed the girl in front of her mother by stabbing her with a knife. The police arrested the youth in this case.
ADVERTISEMENT
Kalyan Crime : आईसोबत घरी जात असताना एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने जीव घेतला. घराच्या परिसरात असतानाच आरोपी तरुणाने अडवले आणि मुलीवर चाकूने सपासप वार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या मुलीने सुटण्याचा प्रयत्न केला, पण नंतर ती कोसळली आणि खाली पडली. रक्ताच्या थारोळ्यातच तिने जीव सोडला.
कल्याण पूर्वमधील तिसगाव परिसरात ही भयंकर आणि थरकाप उडवणारी घटना घडलीये. तिसगाव परिसरात दुर्गा दर्शन सोसायटीमध्ये ही मुलगी कुटुंबासोबत राहायची.
मुलीची हत्या, नेमकं काय घडलं?
आईसोबत ही अल्पवयीन मुलगी सोसायटीच्या आवारात बुधवारी (16 ऑगस्ट) रात्री 8 च्या सुमारास आली. त्याचवेळी एका अनोळखी तरुणाने त्या मुलीला सोसायटीच्या आवारात अडवलं. त्यानंतर या तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप 7 ते 8 वार केले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जखमी मुलगी आणि तिच्या आईने आरडाओरडा केली. आवाज ऐकून सोसायटीतील इतर नागरिकांनी घटनास्थळी धावले. लोक येत असल्याचे बघून आरोपी पळायला लागला.
प्रणिता खाली कोसळली अन् उठलीच नाही
पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी आदित्य कांबळे नामक तरुणाला लोकांनी पकडले. त्यानंतर त्याला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. तोपर्यंत मुलगी प्रणिता दास ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. प्रणिता दासला तातडीने महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले.
ADVERTISEMENT
वाचा >> Sharad Pawar: ‘मी पुन्हा येईन..’ मोदींचा फडणवीस होईल… पवारांचा घाव वर्मी?
रुग्णालयात जाण्यापूर्वीच प्रणिताचा मृत्यू झाला होता. कारण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
ADVERTISEMENT
दरम्यान, आरोपी आदित्य आणि प्रणिता हिच्यावर कोणत्या कारणातून हल्ला केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तर एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT