पोटदुखीमुळे रुग्णालयात गेल्या अन् निघाल्या गर्भवती, अल्पवयीन बहिणींसोबत आक्रित घडलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

minor teenage sister rape investigation disclosure pragnant shocking story from alwar rajasthan crime
minor teenage sister rape investigation disclosure pragnant shocking story from alwar rajasthan crime
social share
google news

राजस्थानच्या (Rajsthan) अलवर (Alwar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत अल्पवयीन बहिणींसोबत हादरवून टाकणारी घटना घडली आहे.या मुलींचे वडील वीटभट्टीवर मजूरीचे काम करायचे.त्या दिवशी अचानक त्यांच्या दोन्ही मुलींना पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे त्यांनी दोन्ही मुलींना डॉक्टरकडे नेले होते.यावेळी डॉक्टरांनी दोन्ही मुली गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती दिली होती.हे ऐकूण वडिलांना मोठा हादराच बसला आहे.या प्रकरणी आता वडिलांनी पोलिसात (police) धाव घेऊन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकणाचा तपास पोलीस करीत आहेत. (minor teenage sister rape investigation disclosure pragnant shocking story from alwar rajasthan crime)

ADVERTISEMENT

अलवर जिल्ह्यातील एनईबी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेतील पीडित बहिणींचे वडील हे वीटभट्टीवर मजूरीचे काम करायचे. त्यांना 15 आणि 13 वर्षाच्या दोन मुली आहेत. त्या दिवशी अचानक त्यांच्या मोठ्या मुलीच्या पोटात अचानक दुखु लागले होते. त्यामुळे त्यांनी तिला रूग्णालयात नेले होते.याचवेळी त्यांच्या छोट्या मुलीने देखील पोटदुखीची तक्रार वडिलांकडे केली होती.त्यामुळे डॉक्टरांनी दोघांची तपासणी केली होती.या तपासणीत दोन्ही अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.त्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्काच बसला.

हे ही वाचा : Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

डॉक्टरांनी पीडितेच्या आई- वडिलांना सांगितले की,त्यांची 15 वर्षाची मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे, तर 13 वर्षाची मुलगी अडिच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती दिली. या माहितीनंतर आई-वडिलांना मोठा हादराच बसला.

हे वाचलं का?

डॉक्टरांच्या या माहितीनंतर आई-वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना या संपूर्ण घटनाक्रमाबाबत विचारण केली. यावेळी अल्पवयीन बहिणींनी धक्कादायक माहिती दिली.सप्पी आणि सुभान या दोन व्यक्तींनी त्यांच्यासोबत वाईट कृत्य केले होते. इतकंच नाही तर छोट्या बहिणीसोबत देखील आऱोपींनी असेच कृत्य केल्याची माहिती मोठ्या बहिणीने दिली. दोन नावे ऐकूण आई-वडिलांना धक्काच बसला. कारण हे दोन्ही आरोपी वडिलांसोबत वीटभट्टीवर काम करायचे. त्यांनीच त्यांच्या दोन मुलींसोबत धक्कादायक कृत्य केले होते. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील मोठ्या बहिणीने वडिलांना सांगितले.

या घटनेनंतर वडिलांनी दोन्ही मुलींना घेऊन पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन बहिणींनी पोलिसांसमोर हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन बहिणींना मेडिकलसाठी पाठवले होते.या मेडिकलमध्ये दोन्हीही मुली गर्भवती असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime: लग्नानंतर अडीच महिन्यातच घेतला स्वत:चा जीव, कारण पत्नी…

या प्रकरणावर एनईबी पोलीस ठाण्याचे एसएचओ अनिल जैन म्हणाले की, या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत एकही आरोपीला अटक झाली नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT