Mumbai Crime : जीव वाचवण्यासाठी बाथरूमकडे धावली, पण…; मीरा रोडमध्ये भयंकर हत्याकांड

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mira road crime story 20 year old boy killed her aunt shocking crime news
mira road crime story 20 year old boy killed her aunt shocking crime news
social share
google news

Mira Road Crime Story : मीरा रोडमधून (Mira Road) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेची (Women) तिच्याच राहत्या घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. शबनम खान असे या 31 वर्षीय महिलेचे नाव आहे. शबनमची हत्या ही तिच्या नात्यातील एका व्यक्तीने केली आहे. या प्रकरणी आता एका 20 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. हा तरूण मृत महिलेचा भाचा होता. त्यामुळे आता भाच्याने मावशीची हत्या का केली? यामागचा तपास पोलीस (Police) करीत आहेत. (mira road crime story 20 year old boy killed her aunt shocking crime news)

ADVERTISEMENT

मीरा रोडच्या क्वीन्स एव्हेन्यू इमारतीत शबनम खान तिच्या नवरा आणि 10 वर्षीय मुलासोबत राहत होती. सोमवारी दुपारच्या सुमारास 20 वर्षीय आरोपी भाचाने शबनमच्या इमारतीत शिरूर घरात घुसखोरी केली.घरात आल्यानंतर आरोपी भाचाने शबनमसोबत वाद घालायला सुरूवात केली. तब्बल अनेक मिनिटे दोघांमध्ये वाद सूरू होते. त्यानंतर हा वाद इतका पेटला की पुढे भयानक घटनाच घडली.

हे ही वाचा : Maratha Reservation: ‘त्या’ कुणबी जात प्रमाणपत्राला मराठा तरुणाने लावली आग!

प्राथमिक माहितीनूसार,आरोपी भाचाने मावशी शबनम सोबत वाद घालत असताना अचानक चाकू बाहेर काढला होता. हा चाकू शबनमने पाहताच भाचा तिच्यावर हल्ला करणार असल्याचे तिला कळून चुकले होते. त्यामुळे आपली जीव वाचवण्यासाठी शबनमने बाथरूमच्या दिशेने धाव घेतला. यावेळी आरोपी भाचाने देखील तिचा पाठलाग केला. आणि बाथरूममध्ये मामी शबनमच्या पोटात चाकूने भोसकून तिची हत्या केली. या हत्येनंतर आरोपीने शबनमचा 10 वर्षीय मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

या घटनेनंतर शबनमने जिवित असताना घरातील डेंजर अलार्म वाजवला. ज्यामुळे ही घटना शेजाऱ्यांना कळाली. त्यानंतर हा अलार्म वाजताच आरोपी भाच्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. शेजाऱ्यांनी शबनमला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान या प्रकरणात नवघर पोलिसांनी पथके तयार करून जीशानचा शोध सूरू केला. साधारण तासाभरानंतर भाचा जीशानला भाईंदर (पश्चिम) येथून अटक करण्यात आली. यानंतर जीशानवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या निर्घृण हत्येमागील कारणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation: ‘साहेब याचे परिणाम बघा कसे भोगायला लागतील..’, जरांगे-पाटलांचा कोणाला थेट इशारा?

मालमत्तेवरून दोन्ही कुटुंबियांमध्ये कौटुंबिक वाद सूरू असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. जीशानचे वडील शबनमच्या पतीचे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे त्याच्यात मालमत्तेवरून वाद सूरू होता. या वादातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणात शबनमचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT